
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यात बऱ्यापैकी प्रजन्यवृष्टी झाली आहे. अशा परिस्थितीत मा. मुख्यमंत्री महोदय, पालक मंत्री मा. ना. संजय राठोड महोदय व मा. सचिव, आयुक्त आणि संचालक (वैद्यकीय शिक्षण व संशोधन) तसेच मा. जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्याकडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या सूचनेप्रमाणे श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पूरग्रस्त रुग्णांसाठी आपत्कालीन व्यवस्था अद्यावत ठेवण्यात आली आहे.
पूरसदृश्य परिस्थितीत पूर्व प्रभावित रुग्ण व पुरानंतर होणारे डेंगू, मलेरिया, लेप्टोपायरोसिस, टायफाईड यासारखे आजार उद्भवल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सर्वोत्परी तयारी रुग्णालयात ठेवण्यात आली आहे. त्यासाठी लागणारी औषध व तत्सम साहित्याचा पुरवठा उपलब्ध करण्यात आला आहे.
पूरग्रस्त रुग्णांना आवश्यक असलेले औषध उपचार करण्याकरता महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अनिल बत्रा यांच्या मार्गदर्शनात व त्यांच्या सूचनेप्रमाणे औषध शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.बाबा येलके व त्यांचे पथक प्रमुख डॉ.गणेश जाधव, डॉ. शेखर घोडेस्वार, डॉ. चंद्रशेखर धुर्वे आणि औषध शास्त्र विभागातील डॉक्टर्स आणि नर्सेस कार्यरत असून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेंद्र भुयार, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. अमर सुरजुसे, डॉ. दुर्गेश देशमुख आणि डॉ.अरविंद कुळमेथे यांचे मार्गदर्शनात आकस्मिक विभागाचे वैद्यकीय अधिकारी हे वेळोवेळी आवश्यक ती लागणारी व्यवस्था बघत आहे.
