
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पंचायत समिती कळंब अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धोत्रा व सुदाम विद्यालय धोत्रा येथे दिनांक १०,११ व १२ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. उद्घाटनिय कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. गटविकास अधिकारी श्री. भूपेंद्र बाहेकर साहेब तर उद्घाटक मा. श्री. कृष्णाभाऊ कडू अध्यक्ष सुदाम शिक्षण प्रसारक मंडळ हे होते. या कार्यक्रमास सरपंच श्री शिवानंद येसनसुरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गंगादिन सुडीत, गटशिक्षणाधिकारी श्री. अमोल वरसे साहेब, वि.अ.शि. श्रीमती वैशाली चिरडे, शा.पो.आ. अधीक्षक श्रीमती मंजुषा डंभारे, सावरगाव केंद्राचे केंद्र समन्वयक श्री रमेश बरडे सर, जि.प.शाळा मु.अ. श्री.गजानन रेंघे सर, सुदाम विद्यालय धोत्रा मु.अ. श्री गुणवंत गांजरे सर, सर्व केंद्राचे केंद्र समन्वयक, विषय शिक्षक व साधन व्यक्ती उपस्थित होते. उद्घाटनपर कार्यक्रम आज सावरगाव व परसोडी शाळेने नृत्याचे सादरीकरण केले. सोबतच बंजारी नृत्य देवनाळा शाळेने कार्यक्रमात रंगत आणली. सामने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. तालुकास्तरीय चॅम्पियनशिप जिल्हा परिषद शाळा मेंढला ने पटकावले. दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी बक्षिस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी श्री भूपेंद्र बाहेकर साहेब होते. प्रमुख पाहुणे श्री कृषी अधिकारी, श्री भोयर साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री अमोल वरसे साहेब, श्रीमती वैशाली चिरडे क्रीडा सचिव तसेच सर्व केंद्र समन्वयक सर्व मुख्याध्यापक, शिक्षक विषय शिक्षक, साधन व्यक्ती, सर्व समिती अध्यक्ष व सर्व संघटनेचे अध्यक्ष/सचिव मु.अ,जि.प.शाळा धोत्रा व मु.अ.सुदाम विद्यालय धोत्रा, सावरगाव केंद्रातील सर्व मु.अ. व शिक्षक व कर्मचारी व मैदान समिती प्रमुख श्री अर्जुन मोगरकर केंद्द्राप्रख यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अथक परिश्रम घेतले.
