

वणी :- श्रीगुरुदेव सेना व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व सामान्य शेतकरी,शेतमजूर, वयोवृद्ध निराधार, दिव्यांग, व विधावा माता बघिणी व बेरोजगार युवक युवतीच्या विविध मागण्यांना घेऊन जनआक्रोशी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा ११ आक्टोबर २०२२ रोज मंगलवारला जत्रा मैदान येथून दुपारी १२ वा. निघणार असून दुपारी दुपारी १ वाजता तहसील कार्यालयावर धडक देणार आहे.
हा मोर्चा श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात निघणार असून यातील खालील मागण्या असणार आहे. यात वयोवृद्ध, विधवा माता बघिणी व दिव्यांगणा मिळणारे तुटपुंजे १ हजार निराधार मासिक वेतन वाढवून ५ हजार रुपये करण्यात यावे, निराधार लाभार्त्यांचे वय मर्यादा ६५ वर्ष असून ती ६० वर्ष करण्यात यावी, निराधार पात्रतेसाठी २१ हजार रुपये असलेली वार्षिक उत्पनाची अट ७५ हजार रुपये करण्यात यावी, ५ एकर खालील सर्व शेतकऱ्यांना निराधार योजनेचा लाभ देण्यात यावा, दिव्यांग व्यक्तींसाठी निराधार योजनेकरिता १लाख वार्षिक उत्पन्न मर्यादा करण्यात यावी, सर्व दिव्यांग नागरिकांना २ लाख रुपया पर्यंतचे व्यावसायिक कर्ज ८०% अनुदानावर विनाअट देण्यात यावे, निराधारांच्या मासिक वेतन नियमित देण्यात यावे, सर्व बेरोजगार सुशिक्षित युवक – युवतींना कायम स्वरूपी रोजगार मिळेपर्यंत १५ हजार रुपये मासिक भत्ता देण्यात यावा, ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, पुरपीडित शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी, यावर्षी अतिवृष्टी झाल्याने सर्व शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ देण्यात यावा, जीवनावश्यक वस्तूवरील लावलेला जि.एस.टी. कर रद्द करावा व वाढती महागाई कमी करावी, सर्व निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडाव्या याकरिता इलेक्ट्रिक वोटिंग मशीन (ईव्हीएम) बंद करून बॅलेट पेपरवर पार पाडाव्यात, शेतकरीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यावरील जीएसटी कर तात्काळ रद्द करावा, आदी मागण्यांना या मोर्चातून ठेवण्यात येणार असून या मोर्चात तालुक्यातून हजारो नागरिकांनी सहभागी होण्यासाठी गावागावात जाऊन जनजागृती केल्या जात असून या मोर्चाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद ही मिळत असल्याने प्रस्थापित राजकीय पक्षाच्या पायाखालची माती हळूहळू हलु लागली आहे.
गावागावातून मोर्चाला वाढता प्रतिसाद
आयोजित जनआक्रोश मोर्चाला तालुक्यातच नाही तर वणी विधांनसभा
सभेतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. हा मोर्चा प्रचंड मोठा असणार असून नागरिक स्वयंपेरनेने यात सहभागी होणार आहे. हे या मोर्चाचे विशेष असणार आहे.
