राष्ट्रवादी इनकमिंग सुरूच!, हिंगणघाट शहरातील सामाजिक कार्यकर्ते कुणाल गोल्हर यांच्यासह शेकडो तरुणांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात पक्ष प्रवेश

हिंगणघाट – हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. मोठ्या संख्येने अनेक युवक राष्ट्रवादी पक्षात पक्ष प्रवेश करीत आहेत. आता पुन्हा हिंगणघाट शहरातील सामाजिक कार्यकर्ते कुणाल गोल्हर यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.
सदर पक्ष प्रवेश कार्यक्रम दिनांक १९ सप्टेंबर रोजी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात पार पडला.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहराध्यक्ष बालु वानखेडे यांची उपस्थिती होती.

हिंगणघाट शहरातील सामाजिक कार्यकर्ते कुणाल गोल्हर यांनी अतिशय योग्य असा निर्णय घेतला आहे. गेल्या काही काळापासून त्यांनी केलेले सामाजिक कार्य हे कौतुकास्पद असे राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा मतदारसंघाला तसेच पक्षाला निश्चितच फायदा होईल, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी उपस्थितांना संबोधित करत त्यांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी विनोद घिमेकर गुरुजी, पुंडलीकराव गोल्हर, आदित्य फुकट, विशाल टेकाम, रितेश कुडे, धनराज दुरने, विशाल तामगाडगे, रुद्राक्ष निमजे, प्रविन लोनबडे, हर्षल भगत, मोहित उताने, हर्षल कापटे, अमित मेश्राम, महेंद्र शाहू, प्रथमेश मांडवकर, निखिल भोकरे, गौरव तिजारे, माणिकरावजी राजनदे या सर्वांना यावेळी पक्षात प्रवेश केला.सर्वांना पक्षाचा दुपट्टा घालून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा बूथ अध्यक्ष अमोल बोरकर,सरपंच साहेबराव येडे, तालुका संघटक पंकज भट्ट, चेतन काळे, विपुल वाढई यांची आदी उपस्थित होते…