
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
पोळा सणावर कोरोनाचे सावट असले तरी बैलाची पूजा घरोघरी करण्यात आली तहसिलदार डॉ रवींद्र कुमार कानडजे यांनी सुद्धा यावेळी आपल्या घरी पूजा केली त्यावेळी त्यांनी स्वतः झडती म्हणून शेतकऱ्याप्रती असलेली आपली आस्था प्रकट केली सायंकाळी बैलांच्या घुंगुर माळांचा आवाज आला,
तेव्हा पूजेसाठी आणि पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालण्यासाठी तहसिलदार यांनी बैलजोडी चालक शेतकऱ्याला आवाज दिला तहसीलदार यांनी यावेळी बैलजोडीची पूजा केली बैलजोडी ला पुरण पोळीचा नैवेद्य दिला आणि सोबतच शेतकऱ्याला एक झडती म्हणण्याची विनंती केली.
त्याला झडती येत नसल्याने, शेवटी तहसीलदार यांनीच झडती म्हटली सद्यस्थितीत शासनाची जी ई पीक पाहणी सुरू आहे, तिला गती यावी, यासाठी बैल मालकाला आणि पार्वती शंकराला उद्देशून असलेली झडती तहसीलदार यांनी यावेळी म्हटली सध्या या झडतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मोठ्या अधिकाऱ्याने झडती ची परंपरा जोपासल्या बद्दल समाधान व्यक्त होत आहे हे
शेतकरी:
हर ऽ बोला हर ऽ हर ऽऽ महादेव
वाटी रे वाटी खोबऱ्याची वाटी देव कवा धावंल, शेतकऱ्यासाठी?
पार्वती:
महादेवानं आणलाय ई पिक पेरा पार्वती म्हणते, महे शेत -महा सातबारा
मोबाईलनं पहिल्यांदा पेरवा भरा,
तुम्ही शंकरा
बैल :
द्यावा आमच्या चौऱ्या मटाट्याचा झाडा
पीकं, झाडं, आणि धुरेपड भरा
जे शेत देते आम्हा चारा,
त्याची काळजी करा
मगच जा तुम्ही आपल्या घरा
सर्व शेतकरीवर्ग :
पहिले नमन पार्वती गौरा,
हर ऽऽ बोला हर ऽ हर ऽऽ महादेव.
