
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथिल किशोरवयीन मुलींना दिनांक ३० डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण विचार विकास सामाजिक संस्था वरोरा यांच्या कडून रिधोरा येथिल सरपंच उमेश गौऊळकर , सचिव वीना राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत किशोरवयीन मुलींना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले आहे सदर
शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जाताना नेमकी काय काळजी घ्यायची याविषयी किशोरवयीन मुलींमध्ये अनभिज्ञता दिसून येते . या विध्यार्थीनींना किशोर वयाबाबतचे शास्त्रीय माहिती उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. यासाठी रिधोरा येथे दोन दिवसीय मार्गदर्शन व प्रशिक्षण मेळावा ग्रामपंचायत तर्फे आयोजित करण्यात आला होता .किशोरवयीन मुलींना त्यांच्यातल्या सुप्त गुण तसेच काही अडीअडचणी घरून होणाऱ्या भेदभाव असो या मुलगा व मुली मधले भेदभाव या बद्दल प्रशिक्षण दिले. मासिक पाळीबाबत असणारे मुलींचे समाज-गैरसमज , किशोरवयातील शारीरिक व मानसिक बदल , योग्य आहार आरोग्याशी निगडित समस्या याची माहिती दिली हा उपक्रम विचार विकास सामाजिक संस्था वरोरा या सामाजिक संस्था चे संचालक श्री किशोर बाबाराव चौधरी, श्री निहाल घोटे (अभियंता), कल्पना गाढवे संचालक ,गौरी चौधरी, नीलिमा चौधरी, ग्रामपंचायत रिधोरा सरपंच उमेश गौळकार , सचिव वीना राऊत, अंगणवाडी सेविका मीराबाई करपते, प्रतिभा राऊत,आशा वर्कर वैशाली चौधरी, आरोग्य कर्मचारी तळवी, सुनिता कांबळे, शिक्षिका एच.एम.पांडे, उपस्थित होते.
