प्रा. वसंत पुरके यांना मतविभाजनाचा बसला फटका

राळेगाव विधानसभा मतदारसंघात प्रा. डॉ. अशोक उईके विजयी

राळेगाव विधानसभा मतदार संघामध्ये महायुती विरुध्द महाविकास आघाडी अशी एकासएक लढत होती. मात्र या लढतीमध्ये इतर छोटे पक्ष व अपक्ष उमेदवारांनी तब्बल १४ हजार २४२ मते घेतली. त्यामुळे एकाएक वाटणारी लढत इतर मतदारांमध्ये विभागल्या गेल्याने त्यांचा फटका काँग्रेसचे उमेदवार प्रा. वसंत पुरके यांना बसला. तर भाजपचे उमेदवार प्रा. अशोक उईके यांनी आपल्याराजकीय कौशल्याने २ हजार ८१२ मतांनी विजयाची हॅट्रीक केली. विभानसभा राळेगाव मतदारसंघात भाजपचे उमेदवार प्रा. डॉ. अशोक उईके १०१३९८ मते, काँग्रेसचे उमेदवार वसंत पुरके ९८५८६ मते, वंचितचे किरण कुमरे
२९३८, मनसेचे अशोक मेश्राम २०२३, प्रहारचे डॉ. अरविंद कुळमेथे १६७१, सन्मान राजकीय पक्षाच्या सुवर्णा नागोसे १३०२, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जीवन कोवे ३६७, राष्ट्रीय समाज पार्टीचे रामदास माहुरे २३७, अपक्ष उद्धव टेकाम २८१६, रमेश कनाके ८५७ बबनराव गेडाम ७१४ (अपक्ष) मते घेतली. इतकेच नव्हे तर नोटाला १३१७ मतदारांनी पसंती दिल्याने मतदार संघात झालेल्या मतविभाजनचा फटका काँग्रेसचे उमेदवार पुरके वसंत यांना सला, तरभाजपचे उमेदवार अशोक उईके यांना काँग्रेसकडे वळणाऱ्या मतांचे विभाजन झाल्याने, त्यांचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे