

सहसंपादक : रामभाऊ भोयर
ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ राळेगाव द्वारा संचालित मार्कंडेय पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे दरवर्षीच्या आगळी वेगळी उपक्रमांप्रमाणे एक म्हणजेच शाळेतून टॉपर येणार्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांमधे स्पर्धात्मक,वैज्ञानिक तसेच अभ्यासाची रुची निर्माण करण्यासाठी या उपक्रमातून विद्यार्थ्यांमधे प्रेरणा जागृत करण्यासाठी दरवर्षी शाळेच्या दहावी बोर्ड परीक्षेत टॉपर विद्यार्थ्यांच्या हस्ते गणतंत्र दिनाचे दिवशी ध्वजारोहण करण्यात येत असून यंदा च्या ध्वजारोहनाचा मान हर्ष गोपाल खाडे व दिया गोपाल मश्रु यांना मिळाला असून या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी संस्थेचे सचिव डॉ. संतोष कोकुलवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विद्यार्थी केंद्रित गुणवत्ता पूर्ण शिक्षण हेच आमचे ध्येय आहे असे प्रतिपादन केली. या वेळी संस्थेच्या अध्यक्षा तथा प्राचार्या डॉ. शीतल बल्लेवार यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन केले तसेच सर्व पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. संस्थेच्या सर्व शाखांमध्ये अश्या अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यात मार्कंडेय किडूज वाढोना बाजार येथे गावातील नुकताच आर्मी फोर्स मध्ये निवड झालेल्या श्री. रोहित पुंडलिक चहारे या सैनिका च्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या माध्यमातून विद्यार्थ्यांमधे देशसेवेची रुची निर्माण करण्यासाठी या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रम स्थळी गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. भास्कर मानकर, श्री. आकाश पोपट, श्री. प्रकाश पोपट, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.
.
