
प्रतिनिधी::प्रवीण जोशी, यवतमाळ
विविध नामांकित कंपनीच्या रग्गड
किंमतीच्या ४८ मोटार सायकल केल्या हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची कारवाई
दिनांक ३०/०८/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पो.स्टे. उमरखेड हददीत उघडकीस न आलेले गुन्हे तसेच अवध धंदयाबाबत गोपनीय माहिती संबधाने पेट्रोलींग करीत असतांना गोपणीय माहिती मिळाली की, इसम नामे निलेश नारायण सुर्यवंशी रा. वरवट ता. हदगांव जि. नांदेड याने पुसद व उमरखेड शहरातुन मोटरसायकल चोरी केल्या असुन त्या मोटरसायकली त्याचे ताब्यात आहेत. अशा माहीतीवरुन ग्राम वरवट येथे जावून संशयित इसम नामे १) निलेश नारायण सुर्यवंशी वय २१ वर्षे रा. वरवट ता. हदगांव जि. नांदेड यास ताब्यात घेवून त्यास विचारूपस केली असता त्याने यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम या जिल्हयातुन वेगवेगळया ठिकाणाहुन ३१ मोटरसायकल चोरी केल्याचे कबुल केल्याने त्याचेजवळुन चोरीच्या ३१ मोटरसायकली एकूण किमत १८,६०,०००/- रुपयेचा मुददेमाल जप्त केला. त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने मोटरसायकल चोरी व इतर साहीत्य चोरी करणारे त्याचे इतर साथीदार यांचे नावे सांगीतल्याने पोस्टाफ चे मदतीने सावळेश्वर, ढाणकी, हिमायतनगर परीसरातून इसम नामे २) सिध्दार्थ प्रभु काळबांडे वय २७ वर्षे रा. सावळेश्वर ता. उमरखेड, ३) अनिल सुभाष रावते वय २४ वर्षे रा. सावळेश्वर ता. उमरखेड, ४) तानाजी ऊर्फ ओंकार रघुनाथ कतुलवाड वय २० वर्षे रा. ढाणकी ता. उमरखेड, ५) परमेश्वर रंगराव डाके वय २४ वर्षे रा. हिमायतनगर जि. नांदेड, ६) राजु नामदेव काळबांडे वय ३२ वर्षे रा. सावळेश्वर ता. उमरखेड यांना ताब्यात घेवुन त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता आरोपी क्रमांक २) सिध्दार्थ प्रभु काळबांडे याचे ताब्यातून ०३ मोटरसयायकल किंमत १,८०,००० रुपये, आरोपी क्रमांक ३) अनिल सुभाष रावते याचेजवळुन ०७ मोटरसायकल किंमत ४,२०,००० रुपये, आरोपी क्रमांक ४) तानाजी ऊर्फ ओंकार रघुनाथ कतुलवाड वय २० वर्षे याचे ताब्यातुन ०५ मोटरसायकल किंमत ३,००,०००/- रुपये, आरोपी क्रमांक (५) परमेश्वर रंगराव डाके वय २४ वर्षे याचे ताब्यातून ०२ मोटरसायकल किंमत १,२०,०००/- रुपये, आरोपी क्रमांक ६) राजु नामदेव काळबांडे यांचे ताब्यातून चोरीचा मोटारपंप किमत १५,०००/- रुपये असा ४८ मोटरसायकल व ०९ मोटरपंप असा एकुण २८,९७,०००/- रुपयाचा मुददेमाल हस्तगत करून १) पोस्टे वसंतनगर अप क्रमांक २०१/२०२२ कलम ३७९ भादंवि २) पोस्टे उमरखेड अप क्रमांक ५३३/२३ कलम ३७९ भादंवि ३) पोस्टे बिटरगांव अप क्रमांक ३३९/२३ कलम ३७९ भादंवि असे चोरीचे ०३ गुन्हे उघडकीस आणले असुन हस्तगत केलेल्या मोटरसायकलची माहीती घेणे सुरु असुन यवतमाळ, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम या जिल्हयातील मोटरसायकल चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
आरोपी नामे १) निलेश नारायण सूर्यवंशी, २) सिध्दार्थ प्रभु काळबांडे, ३) अनिल सुभाष रावते, ४) तानाजी ऊर्फ ओकार रघुनाथ कतुलवाड, ५) परमेश्वर रंगराव डाके, ६) राजु नामदेव काळबांडे यांचेसह जात मुद्देमाल पुढील कार्यवाही करीला पो.स्टे.. वसंतनगर पुसद चे ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात पो.नि. स्थागुशा श्री. आधारसिंग सोनोने, सपोनि गणेश बनारे, गजानन गजभारे, अमोल सांगळे, पोलीस अमलदार बबलु चव्हाण, तेजाब रंणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, सोहेल मिर्झा, पंकज पातुरकर, सुनिल पंडागळे, मोहम्मद ताज, दिंगबर गिलें, किशोर झेंडेकर, मिथुन जाधव, अमित झेंडेकर सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
