मोटार सायकल चोरास अटक राळेगाव पोलिसांची कार्यवाही

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

संतोष नामदेव वाघमारे राहणार वर्धा यांनी राळेगाव शहरातील विश्रामगृह येथे मोटार सायकल स्प्लेंडर प्लस एम एच 32 ए यु .6503 पार्क करून ठेवली व कामानिमित्त बाहेर गेले व परत आले असता त्यांना तिथे मोटरसायकल आढळली नाही करिता त्यांनी राळेगाव पोलीस स्टेशनला जबानी रिपोर्ट दिला यावरून राळेगावचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक जाधव साहेब यांनी गुन्हा नोंदवून गुन्हा तपासात घेतला व आपल्या कर्मचाऱ्यांना कामाला लावले गोपनीय बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की लोहारा जंगल परिसर क्षेत्रात संशयितरित्या एक इसम वर्णन केलेल्या मोटरसायकल वाहन घेऊन फिरत आहे माहिती मिळतात खाजगी वाहन घेऊन रायगाव पोलीस कर्मचारी त्या परिसरात गेले असता एक अज्ञात इसम संशयितरित्या माहिती दाराच्या सांगण्यानुसार आढळला पोलीस दिसतात त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु मोठ्या शितापतीने त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडण्यात यश मिळवले व राळेगाव स्टेशनला आणले त्याला पॉलिसी खाक्या दाखवताच त्यांनी स्वतःचे नाव सुमित निरंजन भगत राहणार नांझा तहसील कळंब जिल्हा यवतमाळ हल्ली मुक्काम यवतमाळ असे सांगितले व त्यांनी यवतमाळ जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चार मोटार सायकल चोरून आणल्या व लोहारा परिसरात घनदाट जंगलामध्ये एका खड्ड्यामध्ये झाकून ठेवल्या होत्या त्यावरून त्या मोटारसायकली जप्त करून राळेगाव पोलीस स्टेशनला आणल्या. पकडलेल्या मोटारसायकलीची अंदाजी किंमत 290000 आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री पवन बनसोड साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा श्री रामेश्वर व्यंजने साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव साहेब राळेगाव पोलीस स्टेशन, पोलीस अंमलदार गोपाल वास्टर, सुरज गावंडे, सुरज चिव्हाणे विशाल कोवे यांनी केली.