
काटोल –
मानव विकास कार्यक्रम व विदर्भ विकास मंडळ अंतर्गत जिल्हा परिषद , नागपूर द्वारे संचालित जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथे सुरू होणार आहे.
माजी गृहमंत्री तथा आमदार अनिलबाबू देशमुख यांच्या अथक प्रयत्नामुळे व जि.प.सदस्य चंद्रशेखर कोल्हे व जि.प.सदस्य सलील देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे अभ्यासकेंद्रासाठी निधी उपलब्ध झाला आहे.
या स्पर्धा परीक्षेतुन निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत उच्च पदावर पोहचण्याकरिता मार्ग उपलब्ध होईल.अभ्यासकेंद्रात अडीच हजार पुस्तके, तीस संगणक, इंटरऍक्टिव्ह बोर्ड उपलब्ध असून अतिथी मार्गदर्शन सुविधा उपलब्ध असणार आहे.ही सुविधा स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच असणार आहे.अभ्याकेंद्रात प्रवेशाकरिता प्रवेश परीक्षा असणार आहे.त्याकरिता काटोल-नरखेड तालुक्यातील रहवासी असावा.वय १८ ते ३५ व शिक्षण किमान बारावी उत्तीर्ण अपेक्षित आहे.
जि.प.कन्या शाळा, काटोल येथे दि.५ ऑगस्ट पर्यत फॉर्म भरता येईल.प्रवेश परीक्षा दि.८ ऑगस्ट ला जि.प.माध्यमिक मुलांची शाळा, काटोल येथे आयोजित केली आहे.तेव्हा काटोल -नरखेड तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दयावी असे आवाहन गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड व शिक्षण विस्तार अधिकारी संतोष सोनटक्के यांनी केले आहे.
