
शहरातील प्रगती नगर येथे वास्तव्यास असलेल्या एका 35 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दुपारी 3 वाजताचे सुमारास उघडकीस आली आहे.
पियुष पारसमल मेहता ( 35 ) असे मृतकाचे नाव आहे. तो प्रगती नगर येथील रहिवासी असून तो धान्य खरेदीचा व्यवसाय करीत होता. शुक्रवारी त्याने राहत्या घरी गळफास घेतला. परिवाराच्या ही बाब लक्षात येताच त्याला येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.पियुष च्या मागे वडिल, पत्नी व 5 वर्षाची मुलगी असा परिवार आहे. त्याने आत्महत्या का केली याची माहिती मिळू शकली नाही. पुढील तपास वणी पोलीस करत आहे.
