
मारेगाव: सध्या स्थितीत मारेगांव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्याला उत आलेला आहे व अवैध धंदेवाल्याची अरेरावी सुरु आहे. तालुक्यात कुंभा, मार्डी, नवरगांव व पिसगांव, बोटोणी इत्यादी ठिकाणी अवैध वरली मटका व्यवसाय सुरु आहे .तसेच मारेगांव तालुक्यात ठिकठिकाणी अवैध जुगार सुरु आहे. तालुक्यातुन रात्री बेरात्री लाखो रुपयाची लपुन छपुन गोवंश तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे.
सततच्या पावसामुळे पहीलेच शेतकरी व शेतमजुर हवालदिल झाले असून आर्थीक विवंचनेत असुन तालुक्यात अवैध धंदे सुरु असल्यामुळे शेतकरी शेत मजूर भरकटल्या जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होणारा तालुका म्हणून ओळखला जात असला तरी तालुक्यातील अवैध वरली मटका, जुगार, व गोवंश तस्करीला लगाम लावण्यात यावा. अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली तर तालुक्यातील अवैध व्यवसाय येत्या ७ दिवसाच्या आत कायम स्वरुपी बंद झाले नाही तर भारतीय जनता पार्टी मारेगांव तालुक्याच्या वतीने पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्यात येईल. व याची सर्वस्वी जबाबदारी मारेगाव पोलिसांची राहील असे निवेदनातून करण्यात आली.
यावेळी उपस्थित ज्ञानेश्वर चिकटे, प्रशांत नांदे, अनुप महाकुलकार अविनाश लांबट, वैभव पावार, पवन ढवस, प्रसाद ढवस, रविंद्र टोंगे शशीकांत आंबटकर, गणेश झाडे,आनंद पचारे,सुहास वरारकर,दुष्यंत निकम लिलाधर काळे, मारोती तुराणकर
चंद्रकांत धोबे यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
