
ढाणकी
बाजारपेठेचा कानोसा घेऊन त्या ठिकाणी आपण थाटत असलेल्या पतसंस्था मल्टीस्टेट या बाजाराला किती आर्थिक फायदा होईल हे हेरून फसव्या बाजाराचे बसस्थान बसविले जाते. ढाणकी शहरात सुद्धा आर्थिक ऊलाढाल बऱ्यापैकी व बाजारपेठ मोठी असल्यामुळे ठगसेन भामट्यांची नजर नेहमीच या ठिकाणी राहिलेली आहे. काही दिवसांपूर्वी थाटामाटात उद्घाटन झाले त्या ठिकाणी अव्वाच्या सव्वा व्याजाच्या मोबदल्याचे आमीष दाखविले आणि मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्यावर एकाएकी व्यवहार थांबले त्या संस्थेने पलायन केले. अशा ठिकाणी गुंतवणूक करणे म्हणजे “धनी दिलगीर आणि चोरटे खुशाल” पुसद येथील एका पतसंस्थेने सुद्धा अशीच फसवणूक केली व लोकांचे लाखो रुपये बुडीत खात्यात गेले. त्यामुळे ढाणकी शहरात सुद्धा एक पतसंस्था डबघाईला आली व ती पळून जाणार अशा चर्चेला उधाण आल्यामुळे ग्राहक मात्र चांगलेच हैराण आहेत. ढाणकी शहरात सुद्धा मल्टीस्टेट वाल्यांचा ऊत आलेला आहे. ढाणकी शहरात सुद्धा आर्थिक घोळ चव्हाट्यावर येणार??
“आला मल्टीस्टेट वाल्यांचा मेळा ग्राहक म्हणतात पळापळा” अशी गत झालेली दिसते. विविध ठेवी अंतर्गत मुदत ठेवून योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान नियुक्त केलेले व स्वतःचा फायदा पाहणारे चेले चपाटे करताना जनतेच्या लक्ष वेधून घेतात. पण काही दिवसापूर्वी आरडी एजंट पळून गेला. त्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली पण त्याचा व सर्वसामान्यांच्या रकमेचा थांग पत्ता लागायला तयार नाही. उलट ज्या ठिकाणचा तो एजंट रक्कम घेऊन पळून गेला त्या ठिकाणी ग्राहक चौकशी करता गेले असता कारवाई चालू असून आमच्या हातात काही नाही असे तेथील मंडळी आवर्जून सांगण्यास विसरत नाही. येणाऱ्या काळात पतसंस्थेने फसवणूक केल्यास त्यात आपण फसल्या जाऊ असे वाटत असल्याने दोन आरडी एजंट सुद्धा राजीनामाच्या तयारी असल्याची चर्चा सुद्धा चवीने चघळल्या जाते हे विशेष. ज्या ठिकाणचा आर डी एजेंट पळून गेला त्या ठिकाणची कर्ज वसुली करणारी मंडळी मात्र आठवणीने शहरात कर्ज वसुलीसाठी येत असते. पण त्यांच्या धोकाधडी व फसव्या कामगिरीमुळे त्यांना लोकांनी नाकारल्याच ऐकिवात आहे. धन्याला धतुरा चोराला मलिदा?? भरडला गेल्या तो सर्वसामान्य ग्राहक.पण आता शहरातील सुज्ञ ग्राहक कोणत्याही प्रकारची रक्कम गुंतवायला तयार नाही विविध पतसंस्थांची उलाढाल ही रोजच्या वसुलीवर असून एकही मोठ्या रकमेची ठेव ठेवायला ठेवीदार तयार नाही. दैनंदिन वसुलीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असून ते सुद्धा काही दिवसांनी बंद पडण्याच्या तयारीत आहे. ढाणकी शहरातील एक पतसंस्था डबघाईला आली असून येणाऱ्या काही दिवसात त्या ठिकाणी आर्थिक गैरव्यवहार होऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे सतर्क राहून व्यवहार करण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. अधिक व्याज देणारी ही नदी कधी “उरावरी” बसेल काही सांगता येत नाही म्हणून जनमानसात पतसंस्थेची गरिमा म्हणजे “गिरी हुई इज्जत”….!
ज्यावेळी परस्परित्या ग्राहकाच्या रकमेवर खोट्या स्वाक्षऱ्या करुन त्याच्या रकमेवर कर्ज उचलणे ग्राहकां प्रति बेज बाबदारपणाच्या वागणुकीमुळे ग्राहकाला मोठा फटका काही दिवसापूर्वी बसला. पतसंस्था सांगत आहेत की आम्ही मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करतो आहे त्यामुळे आम्ही डबघाईला येऊ शकत नाही पण कर्ज देताना हे संचालक मंडळ खिशातून देतात?? सर्वसामान्यांचे पैसे जमा करून ते इथल्या इथेच फिरवायचे व कमी जास्त झाल्यास बुडाला गेला तो सर्वसामान्यच. सोने तारण म्हणून ठेवल्यास जलद पने कर्ज उपलब्ध करून देतो असे सांगून ठेवलेल्या सोन्याची अदलाबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही एक पतसंस्था आर्थिक गैरवावर करून पळून गेली व फसवणुकीच्या झालेल्या सर्व आलेल्या संकटाला स्थानिक प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना तोंड द्यावे लागले त्यामुळे अनेक स्थानिक कर्मचारी राजीनामा देत आहेत. जेणेकरून आर्थिक फसवणूक जरी झाली तरी आपल्याला सामोरे जावे लागणार नाही. अनेक गुंतवणूकदारांनी लांब टप्प्याच्या योजनेत गुंतवणूक केली ती मुदतपूर्व होण्याची वाट बघत आहे जेणेकरून होणारे आर्थिक नुकसान टळेल या उद्देशाने मुदतपूर्व रक्कम घेतल्यास नुकसान होऊ शकते व मिळणाऱ्या व्याजाचा फायदा होणार नाही अशा अपेक्षेने अनेक ग्राहक आपली रक्कम काढावयाचे थांबले. ढाणकी शहरातील एक पतसंस्था डबघाईला आली व ती पोबारा करण्याच्या चर्चेला उधाण आले असून ग्राहकांनी मुदत पूर्ण होईपर्यंत रकमेची वाट बघितल्यास व्याजदर सोडा मुद्दल सुद्धा जाऊ शकते त्यामुळे ग्राहकांनी आपली आहे तेवढी रक्कम जवळ करण्याचा प्रयत्न करणार??
