
उमरखेड : उमरखेड व महागाव तालुक्यात दोन दिवसाअगोदर झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने महागाव तालुक्यातील व उमरखेड तालुक्यातील कोरटा , चिखली व दराटी येथील घरे पाण्याखाली गेली व शेती खरडुन गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले त्या पार्श्वभूमीवर आज आमदार नामदेव ससाने यांनी उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या दालनात दोन्ही तालुक्यातील सर्व विभागातील अधिकार्यांचि तातडीची बैठक घेवुन नुकसान घरांचे, शेतीचे सर्वे तसेच आरोग्य, विज व रस्त्याविषयीबाबत त्वरीत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असून ” शेतकऱ्यांचे नुकसान होवु देवु नका ” अशी तंबी दिल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत .या तातडीच्या बैठकीत आमदार नामदेव ससाने यांनी दोन्ही तालुक्यातील नदि व नाल्याकाठच्या नुकसानीचा शंभर टक्के सर्व्हे करून नोंद करा. तसेच आपादग्रस्त भागात सर्व्हेसाठी , पंचनामे करण्यासाठी गेल्यावर आधिच अस्मानी संकटात सापडलेला शेतकरी व ज्यांचे घर उद्धवस्त झाले ते कुटुंबीय काही बोलले तर त्यांचा तो वैतागलेला संताप समजावा व त्याला त्याचे सर्व शांतपणे ऐकून घेवून मदत होणार असल्याचा दिलासा द्यावा ! त्याचा रोष सत्य मानुन त्यांना मदत जास्तीत जास्त कशी मिळेल यासाठी प्रयत्न करा अशा सुचना आ. ससाने यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत . उमरखेड तालुक्यात ६५ हजार ५१० हेक्टर पेरणीची नोंद असून २५ हजार ५२१ हेक्टर मधील पिके बाधीत झाल्याचा प्राथमीक अंदाज कृषी विभागाच्या अधिकार्यांनी यावेळी बैठकीत सांगीतला . ग्रामीण भागातली दळणवळण या पावसात खराब झालेल्या रस्त्यामुळे थांबली नाही पाहिजे यासाठी दोन्ही तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील रस्त्यांचा अहवाल त्वरीत पाठवीण्याचे सांगून यासाठी रक्कम ( निधी ) उपलब्ध करून देण्याचे सा . बां . विभागाच्या अभियंत्यांना सांगीतले आहे . पुरापासून धोका उपलब्ध झालेल्या गावात आरोग्याच्या दृष्टीने गावागावात फवारणी करा अशा सुचना करून सिंचन विभागातील अधिकाऱ्यांना प्रत्येक नुकसानग्रस्त गावातील नाल्यावर संरक्षक भिंतीसाठी अहवाल पाठविण्याचे सांगीतले आहे . या बैठकीत उमरखेडचे बिडिओ प्रविणकुमार वानखेडे यांचे कौतूक करित आमदार ससाने यांनी घरकुलासाठी पाठविलेला प्रस्ताव शंभर टक्के मंजूर झाल्याचे सांगून अगोदरच्या घरकुलाच्या कामाबरोबरच मंजूर झालेल्या घरकुलांची कामे युद्धपातळीवर करण्याचे सांगून विशेष लक्ष यामध्ये घरकुल मंजूर असलेल्या व नाल्याकाठावरील घरे असतील तर त्वरीत त्यांना मदत करण्याचे सांगीतले आहे. या आपातकालीन तातडीच्या बैठकीला उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे , उमरखेड व महागाव तहसिलदार , गटविकास अधिकारी, तालूका कृषी अधिकारी, उपकार्यकारी अभियंता सा.बां . विभाग, जि.प . बांधकाम विभाग क्र.२, उपकार्यकारी अभियंता मराविमं, उपकार्यकारी अभियंता जलजीवन मिशन, उपकार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना , उपकार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे पुसद, उपकार्यकारी अभियंता जि .प . सिंचन विभाग पुसद , मुख्याधिकारी उमरखेड, महागाव व ढाणकी, उपकार्यकारी अभियंता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालय क्र .२ व ५ हे उपस्थित होते .
चौकट : विज वितरण कंपनीच्या अभियंत्याला धारेवर धरले !
आज शहरात गणेश उत्सवाच्या पार्श्वभुमीवर शांतता कमिटीच्या बैठकीत गैरहजर राहणारे मुख्य अभियंता जैन हे आढावा बैठक संपत असतांना हजर झाले . उत्सव काळात रात्रीच्या वेळी विज गायब होते . या दृष्टीने मागील महिनाभरा पासून प्रत्येक दहा मिनिटात तिन वेळा विज ट्रिपींग होवून जात आहे . उमरखेड शहर सध्या या जैन नामक अभियंत्याने वाऱ्यावर सोडल्याने आमदार नामदेव ससाने संतापले. उत्सवाच्या काळात शहराची लाईन व्यवस्था जर बिघडली तर संवेदनशिल म्हणून अगोदरच शासन दप्तरी नोंद असलेल्या शहरात जर काही झाले तर संपूर्ण खापर व जबाबदारी ही मराविमं ची राहिल असा इशाराच यावेळी लोकप्रतिनिधी व उपविभागीय अधिकारी यांच्या पत्रावरुन देखील गैरहजर राहणाऱ्या जैन या अभियंत्याला यावेळी देण्यात आला आहे . विशेष म्हणजे शांतता कमिटीत विजेचाच प्रश्न गाजला मात्र तिथे हा अभियंता गैरहजर होता .
सोबत फोटो : आढावा बैठकीत माहिती देतांना आमदार नामदेव ससाने
