
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातुन सरास रेती वाहतूक सुरु आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील हर्रास झालेल्या रेती घाटावरून एकाच रॉयल्टीवर बेसुमार अवैध रेती वाहतूक होते. ओव्हरलोड रेती चे टिप्पर, ट्रक राळेगाव तालुक्यातील खैरी मार्गे वडकी परिसरातुन जातात .
रेतीच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची तर वाट लागतच आहे शिवाय ही रेती वाहतुक करणारी वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. एकाच रॉयल्टीचा वापर करून बेसुमार रेती वाहतुक केली जात असल्याने शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे आपण याकडे लक्ष देउन एकाच रॉयल्टीवर होणारी अवैध ओव्हरलोड रेती वाहतुक बंद करावी तसेच शासकीय कामावर व कॅनलवर टाकलेली रेतीची पास तपासावी व अवैध्द आढळल्यास ती तालुक्यातील गरजु घरकुल लाभार्थ्याना मोफत दयावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राळेगाव तालुका च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे च्या वतीने उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना दिलेल्या निवेदनातुंन देण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, मनसे तालुकाध्यक्ष राहुल गोबाडे, मनविसे तालुकाध्यक्ष शैलेश आडे, शहर अध्यक्ष प्रतीक खिरटकर, मनसे वाहतूक तालुकाध्यक्ष आरीफ शेख, गणेश मांदाडे, संदिप कुटे, मनसे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
राळेगाव तालुक्यात अनेक घरकुल पात्र लाभार्थ्यांना बांधकामा साठी रेती मिळत नाही. अवैध्य मार्गाने मात्र मोठ्या प्रमाणात रेती ची वाहतूक सुरु आहे. यात कारवाई दरम्यान जप्त केलेल्या रेतीलाही पाय फुटतात अशा घटना समोर येतात. या मुळे कडक कारवाई करावी. जप्त करण्यात आलेली रेती घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप करण्यात यावी. अशी मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या मुळे अवैध्य रेती वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला असून मनसे ने महत्वाच्या प्रश्नाला हात घातल्याची चर्चा तालुक्यात आहे.
