यंग चांदा ब्रिगेड तर्फे पाणी प्रश्नासाठी आज ‘भजन आंदोलन’!

प्रतिनिधी :उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर

चंद्रपुर : पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटावे यासाठी आज आमदार किशोर जोरगेवार समेत यंग चांदा ब्रिगेड च्या सदस्यांनी महानगरपालिके समोर भजन आंदोलन केले.

शहरातील पाणी समस्या सुटावी या करीता उपाययोजना करण्यासाठी आमदार निधी आणि खनीज विकास निधीतून 1 कोटी 43 लक्ष रुपयांचा निधी महानगर पालिका प्रशासनाला दिला. या कामाची निवीदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. आता नियमानुसार हि मंजूर कामे तात्काळ सुरु होणे आवश्यक असतांना सुध्दा केवळ महानगरपालिका पदाधिकार्यांकडून हेतुपरस्पर या कामांना विलंब करण्यात येत आहे. ‘मनपाला जाग व सदबुध्दि यावी याकरीता आज हे आंदोलन केले आहे. मंजूर कामे तात्काळ सुरु करा. जनतेच्या समस्यांना दुजोरा देऊन त्यांची गैरसोय होणे हे काही योग्य नाही. असे जोरगेवर यावेळी म्हणाले. यंग चांदा ब्रिगेड चे सदस्य यावेळी उपस्थित होते.