
सहसंपादक : रामभाऊ भोयर.
उदगीर येथील सक्षम नर्सिंग महाविद्यालयात थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेच्या अध्यक्षा मृणाली काळे मॅडम म्हटल्या की स्त्री शिक्षणाच्या जननी आणि पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा आदर्श नर्सिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे, प्राचार्य संजय बालाजी वाघमारे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की
समाजातील वंचितांसाठी आणि महिलांच्या शिक्षणासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी दिलेले योगदान हे अविस्मरणीय आहे.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली तसेच प्रतिक्षा शिनगारे,संकेत बिराजदार, संगमेश्वर म्हेत्रे या उपस्थित सर्व प्राध्यापकांनी समाजसेविका सावित्रीबाई फुलेंच्या संघर्षावर प्रकाश टाकला आणि नर्सिंग व्यवसायात सेवाभाव जपण्याचे आवाहन केले त्यावेळी सर्व नर्सिंग विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा गौरव करत आदरांजली वाहिली त्याबरोबरच
शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे, हे समाजसेविका सावित्रीबाई फुलेंनी ओळखले होते म्हणून आज आम्ही नर्सिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी त्यांचा हा वारसा रुग्ण सेवा आणि ज्ञानाच्या माध्यमातून पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल. असे यावेळी सर्व सहभागी नर्सिंग विद्यार्थ्यांनी सांगितले अशी माहिती अनिल जायभाये बीडकर यांनी दिली.
