
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
दोन वर्ष कोरोना महामारीमुळे सर्वच विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले या संकटामुळे दोन वर्ष शाळा बंद राहिल्याने ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांनी शाळा आणि शिक्षकच न पाहताच तिसरीचा वर्ग गाठला परिणामी आता त्यांना अक्षरही ओळखता येत नसल्याचे दिसून येत आहे दोन वर्षांपूर्वी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची ही स्थिती आहे.
कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर यावर्षीपासून नियमित शाळा सुरू झाल्या आहेत दोन वर्ष शाळा बंद राहिल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले कोरोना साथीमुळे पहिल्याच वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शाळा आणि शिक्षकांशी संपर्क आला नाही पहिलीच्या विद्यार्थ्यांचे तर वर्गच भरले नाहीत त्यामुळे मागील दोन वर्षात शिक्षक, शाळा, पाटी, खडू, फळा, दिसलेच नाही हे विद्यार्थी शिक्षकाविनाच पास होऊन तिसरीच्या वर्गात पोहोचले आहेत आता या विद्यार्थ्यांना अक्षर ओळख नसल्याचे दिसून येत आहे. मागील जून महिन्या पासून शाळा नियमित शाळा सुरू झाल्या आहेत त्यामुळे शिक्षकांना विशेष उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी लागणार ही त्यांची जबाबदारी राहणार आहे.
*कोरोना काळात मुलाना अभ्यास नव्हता त्यात बाहेर खेळायलाही जाता येत नव्हते म्हणून मुलांच्या हातात मोबाईल आला मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांना व्यसन जडले असून अनेक विद्यार्थी शाळेतून आल्यानंतर अभ्यासाऐवजी मोबाईलवर खेळत असताना दिसत आहे त्यामुळे मुलांना लागलेले मोबाईलचे व्यसन सोडवावे कसे हा मोठा प्रश्न पालकांसमोर आता उभा राहिला आहे.
