
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी केली. या कार्यक्रमात सुरवातीला प्रथम संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पुजन कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विलास निमरड, पर्यवेक्षक दिगांबर बातुलवार शालेय सांस्कृतिक मंत्री रमेश टेंभेकर सर व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी करून कार्यक्रमाला सुरुवात झाली . कार्यक्रमामध्ये सुरुवातीलाच बंजारा बोली भाषेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन गितांचे गायन केले . संत सेवालाल महाराजांच्या जिवनावर, त्यांच्या समाजजागृतीच्या कार्यावर,त्यांनी दिलेल्या तत्वावर, विद्यार्थ्यांच्या मनामधील संताच्या भूमिका कशा बदलत आहे . याचे विवेचन करतांना संताला जाती-धर्माच्या, राज्याच्या, देशांच्या सिमा नसतात हे आवर्जून सांगावे लागले कारण संत सेवालाल महाराजांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील नाही तरीही या राज्यात त्यांचे कार्य प्रचंड आहे . त्याकरीता विद्यार्थ्यांना राज्याची परिभाषा, देशाची परिभाषा कळावी राज्याकडे,पृथ्वीतलावरील असलेल्या देशाकडे पाहण्याची दृष्टी निर्माण व्हावी म्हणून संत सेवालाल महाराज जयंती निमित्य नकाशा भरणे उपक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आला . उन्हाळ्याच्या सुटया मध्ये दोनही नकाशे जे विद्यार्थी पूर्ण करतील त्या विद्यार्थ्यांला ईश्वर चिठ्ठीव्दारे पुढील सत्राच्या शाळेच्या पहील्या दिवशी रोख व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येईल .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश टेंभेकर सर यांनी केले तर आभार मोहन बोरकर यांनी मानले .या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास निमरड पर्यवेक्षक दिंगाबर बातुलवार जेष्ठ शिक्षक रमेश टेंभेकर रंजय चौधरी, राजेश भोयर मोहन आत्राम मोहन बोरकर विशाल मस्के कुंदा काळे मॅडम, वंदना वाढोणकर मॅडम, वैशाली सातारकर मॅडम, ऐन्नावार मॅडम, राहुल तुळणकर, अंकित कंधारकर सर, अश्विनी तिजारे मॅडम,वालमिक कोल्हे,पवन गिरी, शुभम मेश्राम बाबुलाल येसंबरे विनोद शेलवटे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.हाकार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्व विदयार्थी, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .
