
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील एकुर्लि येथील चालू असलेल्या पुलाच्या कामावर संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड येथील नागरिकांमधून होताना दिसत आहे. सविस्तर वृत्त असे तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागा अंतर्गत चालू असलेल्या एकुर्ली चाचोरा रोडवरील एकुर्ली गावामध्ये बऱ्याच दिवसापासून पुलाचे काम सुरू असून या कामावर माती मिश्रित चुरी मध्ये काम केल्याचे येथील नागरिकांकडून बोलल्या जात आहे. व या कामावर कुठल्याही प्रकारचं शिलाफलक लावण्यात आलं नाही व हा निधी कुठल्या फंडातला आहे व किती रुपयांचा आहे याबाबत चे माहिती फलक येथे लावण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. तर या पुलाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याने येथील य जा करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. व या रोडने खैरगाव (जवादे) कडून येणारे भरधाव वेगाने वाहन फुलांमध्ये जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. याचे कारण म्हणजे येथे कुठल्याही प्रकारचे गतिरोधक करण्यात आले नाही. तसेच कीन्ही जवादे कडून येणारे सुद्धा भरधाव वेगाने येणारे वाहन पुला मध्ये जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही याचे कारण म्हणजे हा कमी उंचीचा पूल असल्यामुळे लांबून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना हा पुल दिसून पडत नाही. याबाबत दैनिक देशोन्नती ९ मे च्या अंकात एक बातमी प्रकाशित केली होती या बातमीची दखल घेत फक्त थातूरमातूर सावधानगिरीचे बोर्ड पुला जवळ ठेवण्यात आले आहे परंतु दोन्ही बाजूने भरदार वेगाने येणाऱ्या वाहनासाठी कुठल्याही प्रकारचे गतिरोधक करण्यात आले नाही किंवा पुलाच्या चारही बाजूने कठाडे सुद्धा बनवण्यात आले नाही याआधी बरेच दहा चार चाकी दुचाकी वाहन या फुलांमध्ये जाताना थोडक्यात बचावले आहे. सदर या कामावर संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून सबंधित ठेकेदारांवर कार्यवाही करण्याची मागणी येथील नागरिकांकडून होताना दिसत आहे.
