
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राष्ट्रीय डॉक्टर्स डे. दिनानिमित्त राळेगाव शहर व तालुक्यातील सर्व डॉक्टरांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी, डॉक्टरांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे अधिवक्ता ॲड. वैभव एडगे उपस्थित होते.तसेच डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सोमनाथ भोयर , श्री. गोपाल मशरु, वीरेंद्र मेश्राम ,यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्माननीय डॉक्टरांचा, कार्यक्रमाचे आयोजक राहुल मेश्राम यांनी मानाचा फेटा बांधून, शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी डॉ. सोमनाथ भोयर, डॉ. अशोक थोडगे , डॉ. अश्विनी थोडगे, डॉ. मनोज पांगुळ , डॉ. पुरुषोत्तम उगेमुगे , डॉ. सविता पोटदुखे, डॉ. चंद्रकांत उजवणे , डॉ. श्रीकांत आगलावे , डॉ. अविनाश गलाट, डॉ. सागर कुळसंगे ,डॉ. आकाश खंडाळकर , डॉ. कुणाल भोयर, डॉ. ओमप्रकाश फुलमाळी, डॉ. प्रतिक पांडे, डॉ. शैलेश बरवे इत्यादी डॉक्टर मंडळीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
राहुल मेश्राम यांनी आपल्या मनोगतात डॉक्टर हे समाजाचे खरे जीवनरक्षक असून, त्यांची निस्वार्थ सेवा, समर्पण आणि मानवतेप्रती असलेली बांधिलकी ही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. आधुनिक वैद्यकीय सेवांबरोबरच डॉक्टरांनी समाजात जनजागृती, प्रतिबंधात्मक आरोग्य आणि मानवसेवेची भावना अधिक दृढ करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही डॉक्टरांच्या अथक सेवेला सलाम करत राष्ट्रीय डॉक्टर्स डे दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात उपस्थित डॉक्टरांनी आरोग्य क्षेत्रातील अनुभव मांडत समाजाच्या आरोग्य संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. उपस्थित सर्व डॉक्टर मंडळींनी आयोजक राहुल मेश्राम यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून अशा कार्यक्रमांमुळे डॉक्टरांच्या कार्याचा योग्य सन्मान होत असल्याची भावना व्यक्त केली. डॉक्टर्स डे या
सामाजिक उपक्रमाचे आयोजन दरवर्षी करण्यात येणारं असल्याचे मत राहुल मेश्राम यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमानंतर सर्व सन्माननीय डॉक्टर मंडळी करीता स्नेह भोजनाची व्यवस्था केली गेली.
राळेगाव तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा उपक्रमाचे आयोजन केले गेले अशी भावना उपस्थित सर्व डॉक्टर व मान्यवर मंडळींनी यांनी व्यक्त केली.
