
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत नवजात शिशु बालकांना आरोग्य संरक्षण किट, तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय बॅग व टिफिन बॉक्सचे वाटप करण्यात आले.समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नवजात बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक साहित्य असलेल्या आरोग्य संरक्षण किटचे वितरण करण्यात आले, तर शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने विद्यार्थ्यांना शालेय बॅग व टिफिन बॉक्स देण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मा. संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करत त्यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक कार्याला अधिक गती मिळो, अशी अपेक्षा व्यक्त केली. समाजहिताला प्राधान्य देणारे असे उपक्रम नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ करतात, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमामुळे नवजात बालकांच्या पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी शिवसेना राळेगाव विधानसभा समन्व्यक जानरावजी गिरी,तालुका प्रमुख मनोज भोयर, राळेगाव शहर प्रमुख इम्रान पठाण, तसेच न.पं. बांधकाम सभापती जोत्स्ना ताई राऊत, नगरसेविका कविताताई कुडमेथे,जोत्सना ताई डंभारे,तालुका समन्व्यक भानुदासजी राऊत,युवासेना राळेगाव विधानसभा /संपर्क प्रमुख ऍड.योगेश ठाकरे,युवासेना तालुका प्रमुख मयुर जुमळे,युवासेना शहर प्रमुख सागर वर्मा,महिला आघाडी शहर प्रमुख संगीताताई आगे, उपतालुका प्रमुख दिवाकर जवादे , इंदल राठोड,किशोर वाघ , प्रतीक बोबडे,शहर संघटक दिपक येवले,उपशहर प्रमुख अनिल डंभारे,नितीन हिकरे, जिवन रामगडे, गणेश कुडमेथे, अमर मिसेवार, महिला आघाडी समन्वयक नीता जांभुळकर, महिला आघाडी उपतालुका प्रमुख अर्चना ताई ढाले, वर्षा ताई वनकर, विभाग प्रमुख युवराज चटकी,समीर येरेकर,संजय दूधकोहळे,किशोर कापसे, शीतल ताई चांदोरे,विजया ताई राऊत, सुवर्णाताई धोटे,चंद्रकांत भासपाले, दत्तूजी दाभेकर,
यांच्या सह इतर शेकडो शिवसैनिक , शिवसेना , युवासेना , महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
