कत्तलीसाठी जाणाऱ्या 25 गोवंशाला पोलिसांनी दिले जीवनदान, पोलीस कारवाईत 45 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव: पो.स्टे.वडकी हद्दीतून पांढरकवडाकडे गोवंशाला अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक करत असताना अशोक लेलँड आयशर गाडी क्रमांक MH 40, CT 0432 आणि आयशर क्रमांक MH 40, CD 1340 (प्रत्येकी किंमत 20 लाख रु. प्रमाणे एकूण 40 लाख रु.) या दोन्ही वाहनांची पोलिसांनी माहिती काढून सापळा रचून 04.30 वाजता नमूद दोन्ही वाहन पो. स्टे हद्दीतील देवधरी घाटात ताब्यात घेतले आहे. सदर वाहनातून 25 गोवंश (प्रत्येकी किंमत 20000/- रु. प्रमाणे असे एकूण 500000/- रुपये) कि. चे गोवंश आणि 04 आरोपी ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीतांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 5, 5 अ, 5 ब आणि प्राण्यास कृरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

45 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक, पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा रामेश्वर वेंजने यांचे मार्गदर्शनाखाली वडकी पोलीस स्टेशनचे सपोनि सुखदेव भोरकडे, PSI प्रशांत जाधव, पोहेकॉ 1752/ विनोद नागरगोजे, पो. ना. 2049/ अंकुश पाथोडे, पोकॉ 1310/ किरण दासरवार यांनी केली असून पुढील तपास वडकी पोलीस करीत आहेत..