
प्रतिनिधी//शेख रमजान
बदलत्या युगात नवीन उदयास आलेली AI टेक्नॉलॉजी या द्वारे फोटोचा थ्रीडी इफेक्ट करून
सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा नवा ट्रेंड आला आहे. प्रत्येकजण आपला थ्रीडी इफेक्ट दिलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. तुम्हीही तसाच फोटो तयार करण्याचा विचार करताय? पण हे केल्यानं तुम्ही अडचणीत येऊ शकता. सायबर चोरटे एआय, डीपफेक, टेम्पलेट एडिटिंग आणि बनावट क्यूआर कोडचा वापर करून तुमचं बनावट ओळखपत्र तयार करू शकतात. तेव्हा सावधान!
सध्या या काळात सर्वात जास्त व्हायरल होण्याचे साधन म्हणजे सोशलमीडि यावर कधी काय व्हायरल होईल हे सांगणे खूप कठीण आहे. अलीकडेच जीबली स्टाईलचे फोटो इंटरनेटवर खूप व्हायरल झाले, त्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक नवीन फोटो ट्रेंड आला आहे, जो सर्वांत जास्त व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर FACEBOOK वर लहान, चमकदार आणि कार्टूनसारख्या थ्री डी डिजिटल फिगरिन्स ट्रेंड करत आहेत आणि गुगलच्या नवीन एआय टूल जेमिनी फ्लॅश इमेजने बनवल्या जात आहेत. त्याच वेळी, ऑनलाइन
आधुनिक तंत्रज्ञानामुळे डिजिटल युग आव्हानात्मक होत आहे. या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांची प्रकरना मध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एकप्रकारे सायबर गुन्हेगार तुमची व्हर्चुअल आयडेंटिटी किंवा ओळख चोरून त्याचा गैरवापर करताना पाहायला मिळत आहेत.मागे अनेक प्रकरणे सुद्धा घडली आहे
सायबर चोरटे एआय, डीपफेक, टेम्पलेट एडिटिंग आणि बनावट क्यूआर कोडचा वापर करून तुमचं बनावट फोटो तयार करून ओळखपत्र तयार करू शकतात. या बनावट ओळखपत्रांवरील नावं, क्रमांक आणि डिझाइन खन्ऱ्या ओळखपत्रांसारखेच दिसतात.
या बनावट कागदपत्रांचा वापर बँकेत खातं उघडण्यासाठी, कर्ज मिळवण्यासाठी तसेच मनी लाँडरिंग यांसारखे आर्थिक गुन्हे करण्यासाठी केला जाऊ शकतो.
श्री पांडुरंग शिंदे (API) पो स्टे बिटरगाव बु
युवकांनो सावधान!!!!!!
अजून तरी फसवणुकीची चाहूल लागली नसेल तर तर येणाऱ्या काळ हा AI तंत्रज्ञानाचा धोका आहे .कुठले ही ट्रेंड चालवल्या जातील परंतु तुम्ही तुमचा डेटा हा पब्लिकली करू नका.Ghibli आणि Gemini या AI RETRO TREND हे लोकांना भुलवतील.
GEMINI रेट्रो ट्रेंडने तुमचे कपडे बदलता येत असतील तर ते कपडे काढून पण टाकू शकतात ना?
अशा ट्रेंडनी तुम्ही तुमची परवानगी डायरेक्ट दिली जात आहे ह्याचे भविष्यात वाईट परिणाम भोगावी लागतील.
श्री सागर अन्नमवार (PSI) पो स्टे बिटरगाव बु
