नववधूचा सर्पदंशाने मृत्यू ,सुरुवात होण्याआधीच संपला संसार

i

तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

घाटंजी तालुक्यातील कामठवाडा येथील रहिवासी पायल उकंडा राठोड (वय २२) हीचा सर्प दंशाने झाला मुत्यु झाला.

कामठवाडा येथील रहिवासी उकंडा राठोड यांची मुलगी पायल हिचा विवाह ह्याच महीन्यात दि. २७ मार्च रोजी बोरीअरब जवळील असलेल्या तपोना येथील रहिवासी हरीष चव्हाण या युवकाशी ठरला होता. मात्र पायलच्या नशीबात नववधू बनण्याचे सुखच लिहले नसल्याने दि. १९ मार्चच्या रात्री राठोड कुटुंबांने रात्री घरी जेवण झाल्यानंतर पायल घरातील आवारात भांडे धुत असतांनाच डाव्या पायाला विषारी सापाने चावा घेतला .पायलला घाटंजी येथे उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यासाठी तयार करत असताना तिचा घटनास्थळीच मुत्यु झाला. सुखी संसाराचे नवीन लग्नाचे स्वप्न रगंवीत असतांनाच पायलवर काळाने झडप घातली अन् सारे काही धुळीस मिळाले. राठोड आणी चव्हाण कुटूंब एकत्र येण्या अगोदरच दोन्ही परिवारावर मोठे दु:खाचे सावट ओढावले आहे. कामठवाडा येथे हळहळ व्यक्त केले जात आहे. पायलचा मृतदेह घाटंजी येथे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदना साठी पाठविण्यात आला असून याघटनेचा पुढील तपास घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मणिष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विलास सिडाम हे पुढील तपास करीत आहेत.