
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात भाजपा नेतृत्वावर विश्वास ठेऊन, विकासाच्या मुदयावर भारतीय जनता पक्षात प्रवेश घेणारे इतर पक्षातील दमदार नेते पक्षात दाखल झाले आहे.याच आघाडीवर पुन्हा एकदा शिवसेना (उबाठा ) पक्षाचे कार्यकर्ते यांनी नुकताच भाजपात प्रवेश घेतला आहे.
यात अंकुश गेडाम, गौरव ठाकरे,आदेश आडे, राहुल चौहान, हिरा बोहेत,गोपाल पवार, संदीप ढगले, सतीश ढगले विशाल गदई, अनुराग आत्राम,यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी आदिवासी विकास मंत्री ना.अशोक उईके, जिल्हाध्यक्ष ऍड.प्रफुल्ल चौहान, भाजपा शहर अध्यक्ष शुभम मुके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षा मध्ये प्रवेश केला त्या प्रसंगी सौ सीमाताई येडस्कर,फकिरा देवकर उपस्थित होते.
