मतदार संघात राळेगाव तालुक्याने देशमुख यांना तारले

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राळेगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना 26400 मताची लीड मिळाले त्यामध्ये सर्वाधिक लीड देशमुख यांना मतदारसंघातील राळेगाव तालुक्याने दिली आहे या निवडणुकीत राळेगाव तालुक्याने देशमुख यांना तारले आहे राळेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये राळेगाव बाबुळगाव कळंब या तीन तालुक्यांचा तसेच पांढरकवडा तालुक्यातील रुंझा या जिल्हा परिषद सर्कलचा समावेश होतो. मतदार संघाचा विचार केल्यास देशमुख यांना सर्वाधिक लीड राळेगाव तालुक्याने दिले आहेत राळेगाव तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना 14,500 मताचे मताधिक्य मिळाले. बाबुळगाव तालुक्यातून ४५०० रुंजा जिल्हा परिषद सर्कल मध्ये 3500 तर सर्वात कमी मताधिक्य कळम तालुक्यात 2000 मताचे मिळाले आहेत म्हणजेच राळेगाव तालुक्याने भरभरून मतदान महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांना दिले आहे राळेगाव शहरात 1800 मताचे मताधिक्य देशमुख यांना आहे बाबुळगाव शहरांमध्ये 131 मताचे मताधिक्य तर कळम शहरात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना थोडी आघाडी मिळाली आहे तालुक्यातील झाडगाव वाढोणा बाजार वडकी खैरी धानोरा वरद आधी मोठ्या गावांमध्ये सुद्धा संजय देशमुख यांना आघाडी आहे राळेगाव विधानसभा मतदारसंघातील 350 मतदान केंद्रापैकी 252 केंद्रावर संजय देशमुख यांना तर 94 केंद्रावर राजश्री पाटील यांना मताधिक्य मिळाले आहे तर चार मतदान केंद्रावर दोघांनाही समान मते मिळाले आहेत तालुक्यातील रावेरी येथे देशातील सीतेचे एकमेव मंदिर आहे या ठिकाणी दोन्ही उमेदवारांनी प्रचाराच्या नारळ फोडले होते तेथे सुद्धा महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांना दोन मतदान केंद्रावर 789 मते मिळाली तर महायुतीच्या राजश्री पाटील यांना 352 मते मिळाले महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना 397 मताची आघाडी मिळाली आहे राळेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीच्या उमेदवाराची हवा होती त्यानुसार राळेगाव येथे मोठे मताधिक्य महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाले यामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट प्रफुल्ल मानकर माजी शिक्षण मंत्री प्रा वसंत पुरके ओबीसी सेलचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोणकर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र तेलंगे शहराध्यक्ष प्रदीप ठुने नगराध्यक्ष रवींद्र शेराम उपाध्यक्ष जानराव गिरी वसंत जिनिंगचे सभापती नंदकुमार गांधी खरेदी विक्री संघाचे सभापती मिलिंद इंगोले राळेगाव ग्राविकाचे अध्यक्ष अध्यक्ष सचिन हुरकुंडे शिवसेना उभाता गटाचे विनोद काकडे आदींच्या नियोजनामुळेच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला राळेगाव तालुक्यात मोठे मताधिक्य मिळाले तुलनेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे मतदारसंघात वातावरण असून सुद्धा कळम आणि बाबुळगाव तालुक्यात महाविकास आघाडीचा उमेदवार माघारला याचे चिंतन निश्चितच दोन्ही तालुक्यातील महाविकास आघाडीचा नेत्यांना करावे लागेल एवढे निश्चित तुलनेने रुंझा महसूल सर्कल मध्ये सुद्धा संजय देशमुख यांना मोठे मताधिक्य मिळाले आहेत राळेगाव तालुका पाठोपाठ देशमुख यांना रुंझा सर्कल मध्ये आघाडी आहे