
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पवणार इथे बाल श्री गुरुदेव सेवा मंडळ च्या वतीने वं , राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 57 व्या पुण्यतिथीनिमित्त महाशिवपुराण भाग दोन चे आयोजन करण्यात आले असून 9/ 11/ 2025 पासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे बाळ श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे
कथा वाचक शिव कथाकार सु.श्री, अंकिताताई खाडंगे यांच्या श्रीमुखातून ग्रामस्थांना कथेच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार असून दिनांक 9/11/2025 रोजी ह.भ.प. श्री अनंतराव कोसे महाराज यांच्या हस्ते पहाटे 5 वाजता तीर्थ स्थापना करण्यात येणार आहे.तर सायंकाळी 5 वाजता ग्रंथदिंडी 6 वाजता सामुदायिक प्रार्थना तर 6वाजून 30 वाजता शिव महापुरान कथेचा उद्घाटन सोहळा पार पडणार असून
उद्घाटन सोहळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामीण गृहराज्यमंत्री श्री पंकज जी भोयर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे उद्घाटक वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय अंकित जी जैन साहेब यांच्या शुभहस्ते उद्घाटन केले जाणार असून प्रमुख अतिथी माननीय श्री हरिभाऊ जी वुझरकर प्रमुख उपस्थिती माननीय श्री अजय भाऊ गांडोळे माजी सरपंच पवनार हजर राहणार आहे तर
दररोज 9/ 11 /25 ते 16/ 11/ 2025 सकाळी पाच वाजता 5वाजून 30 वाजता सामुदायिक ध्यान प्रार्थना गावातील विविध प्रभागातून रामधून 8 ते 10 शिवमहापुरान कथा ज्ञानयग्य व सायंकाळी 5 वाजून 30 वाजता समुदाय ध्यान प्रार्थना व नंतर 7ते 10 महाशिवरात कथा ज्ञान यग्य सुरू राहणार असून परिसरातील ग्रामस्थांनी या महाशिवपूरान कथेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन बाल श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे
विशेष सहकार्य
चैतन्य स्पोर्ट पवणार, श्रीराम कोचिंग क्लासेस, ऑटो युनियन मालक संघ, गंगामाता मंदिर, अनमोल गणेश मंडळ, तरंग गणेश मंडळ, विद्यार्थी गणेश मंडळ, बाल गणेश मंडळ काळे मंदिर, श्री चिंतामणी बादल भवानी ग्रुप पवणार, श्री साईबाबा व गजानन महाराज देवस्थान ,माऊली शेतकरी स्वयंसहायता बचत गट, उत्कर्ष महिला बचत गट, नवोदय मा दुर्गा पूजा उत्सव समिती बाजार चौक, नवदुर्गा पुजा उत्सव समिती हनुमान वार्ड नंबर एक, गीताई पूजा उत्सव समितीआबाजी देवस्थान, नवशक्ती दुर्गा पुजा उत्सव समिती, सुदर्शन दुर्गा उत्सव मंडळ पटेल चौक, पुरातन जागृत माता मंदिर, मॉर्निंग ग्रुप पवणार, मा वैष्णवी मंडप डेकोरेशन, इलेक्ट्रिक नवदुर्गा पूजा उत्सव समिती बस स्टँड चौक, अष्टविनायक स्वयंसहायता महिला बचत गट, तर समारोपीय कार्यक्रम दिनांक 16/11/2025
रोजी पार पडणार असून सकाळी 8 वाजता वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा व पालखी दिंडी सोहळा दुपारी 12 वाजता गोपाल काल्याचे किर्तन व दहीहंडी कार्यक्रम
व नंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे याचा सर्व गावकऱ्यांनी अवश्य लाभ घ्यावा असे मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे
