
सहसंपादक ::रामभाऊ भोयर
सध्या ग्रामीण भागामध्ये होमिओपॅथी डॉक्टर गोरगरीब जनतेला सेवा देतात , परंतु त्यांना कायदाची अडचण येत असल्यामुळे, 2014 मध्ये महाराष्ट्र विधिमंडळ महाराष्ट्र विधानपरिषद मध्ये यांच्याकरीता आधुनिक औषध व शासनाच्या महाराष्ट्र (सी.सी.एम.पी) यांचा कोर्स काढून घेतला जेणेकरून त्यांच्या ज्ञानात आणखी भर पडावी हा कोर्स पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अॅट नुसार रजिस्टर नंबर 28 मध्ये नोंद करण्याचे सुद्धा ठरले होते.
यावर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी सुद्धा सही करून महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठा तर्फे तज्ञ डॉक्टरकडून एक वषार्चा कोर्स तयार करून (2017) पासून सरकारने सरकारी मेडिकल सुरू केले, दि. 15/7/2025 पासून नोंद करण्याचे जाहीर केले, मात्र (ई. मा.) संघटनेच्या दबावामुळे शासनाने स्थगिती देण्यात आली, याविरोधात आझाद मैदान मुंबई ला डॉ. बाहुबुली शहा, प्रशासकीय अध्यक्ष महाराष्ट्र कौन्सिल अॅफ होमिओपॅथिक हे आमरण उपोषणाला बसणार आहे त्यांना पाठिंबा म्हणून महाराष्ट्रातील सर्व होमिओपॅथिक डॉक्टर दवाखाने बंद ठेवून तिथे उपोषणाला बसणार आहे तरी शासनाने त्वरित होमिओपॅथिक डॉक्टरचे म्हणणे ऐकावे जने करून रूग्णाचे हाल होणार नाही, तरी मागण्या पूर्ण कराव्यात अशी जनता बोलतानी दिसत आहे.
