
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नगरपंचायत राळेगाव कडून सन 2025 – 26 ते 2028- 29 च्या प्रस्तावित करवाढी विरोधात शिवसेनेचे राळेगाव शहर प्रमुख शंकर गायधने यांच्या पुढाकारात व महिला आघाडीच्या शहर संघटिका पार्वताबाई मुखरे, शारदा चुनारकर, शिवसेनेचे उपशहर प्रमुख पदाधिकारी सुनील क्षिरसागर, योगेश मलोंढे, श्रीकांत कोदाने, निशी मोहन पोंगडे, रवी मेश्राम, वैभव दुधे, रोशन उताणे, सुधाकर शिखरे
महादेव मुखरे, दीपक पुण्यवंतवार व इतर शिवसैनिक यांचे प्रमुख उपस्थितीत मुख्याधिकारी शिरीष पारेकर यांना निवेदन देऊन आक्षेप नोंदविला.
नगरपंचायत ने चतुर्थ वार्षिककर मूल्यांकनात मालमत्तेच्या स्वरूपात प्रस्तावित केलेले महाराष्ट्र शिक्षण कर, उपयोगीता कर, वृक्ष कर, अग्निशमन कर, रोजगार हमी, उपकर इत्यादी करांमध्ये मोठी वाढ प्रस्तावित केली आहे व तशा सूचना नागरिकांपर्यंत पोहोचविल्या आहे. महाराष्ट्र शासनाने राळेगाव ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपंचायत मध्ये केले परंतु शहरात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे कष्टकरी कुटुंब मोठ्या प्रमाणात आहे.
नगरपंचायत महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत वर्षात राळेगाव शहरात शुद्ध पाणी पुरविले नाही नगरपंचायतने महाराष्ट्र शिक्षण कर, उपयोगिता शुल्क, वृक्ष कर, रोजगार हमी, उपकर अग्निशमन करात केलेली वाढ अन्यायकारक आहे उपयोगिता शुल्कात टिन पत्र्यात सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहणारी कुटुंब व कोटी रुपये किमतीच्या घरात राहणारी कुटुंबांना सारखीच वाढ प्रस्तावित केल्याचे दिसून येत आहे. उपयोगिता कराच्या माध्यमातून नगरपंचायत प्रामुख्याने घनकचर्याचे व्यवस्थापन करत असते
नगरपंचायत राळेगाव कडे घनकचरा व्यवस्थापनासाठी लागणारे सर्व साधने व शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेसे मनुष्यबळ नगरपंचायत कडे असताना व तसा शासनाचा नियम असतानाही नगरपंचायत कोटी कोटी रुपये कंत्राट दारावर खर्च का करते? असा प्रश्न शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला प्रस्तावित केलेली कर वाढ विशेष करुन महाराष्ट्र शिक्षण कर व उपयोगिता शुल्क मागे घेण्यात यावी. अन्यथा शिवसेना मोठे आंदोलन उभारणार असा इशारा देण्यात आला आहे.
