
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव ग्रामीण : राळेगाव तालुक्यातील खैरी या गावातील कन्या शाळेच्या समोर असलेली ऍलोपॅथिक दवाखान्याची जीर्ण इमारत पूर्णतः ढासळत चालली असून त्या इमारती आमदार मोठे मोठे भगदाड पडले असून त्यात विंचू, सापासारखे वन्यप्राणी वास्तव्य करते . त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या जीवित वास धोका निर्माण होत आहे. तसेच ही इमारत दिसले आलेली असून दवाखाना व ग्रामपंचायत प्रशासनाने तसे प्रस्ताव वर वरिष्ठ विभागाकडे पाठविलेले आहे परंतु याची दखल गेल्या कित्येक वर्षापासून वरिष्ठ विभागाने घेतली नसून ते जीर्ण इमारत तशीच उभी आहे ती केव्हा कोसळ व त्यात प्राथमिक कन्या शाळेतील कोण्या विद्यार्थ्यात हानी होईल याची शाश्वती नाकारता येत नाही. या जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेमध्ये एक ते चार हे वर्ग भरतात यामध्ये सर्व चिमुकले विद्यार्थी आहेत त्यामुळे यात जर होण्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले तर संबंधित विभाग ग्रामपंचायत हे या दोषाचा आरोप स्वतःवर घेणार का? हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याची खेळ करण्याचा प्रयत्न शासनाकडून चालला नाही आहे का? शाळे कडून सुद्धा याबाबत प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायतला देण्यात आला आहे.
त्या इमारतीच्या दुरावस्थे मुळे दवाखाना दुसरीकडे वर्ग झाला आहे परंतु इमारती तिथेच असून ती केव्हा कोसळेल याची शाश्वती नाही. कदाचित शाळेच्या वेळेत कोसळली तर विद्यार्थ्यांच्या बाबतीत मोठा अपघात घडू शकतो असे वास्तव चित्र आहे. कन्या शाळेसमोरील दवाखान्याची इमारत पडण्याची अवस्थेत असून इमारत नियमाने दिस मेंटल मध्ये येते. याबाबत ग्रामपंचायत स्तरावरून प्रस्ताव सुद्धा गेले सध्याच्या ग्रामपंचायत सरपंचांनी स्वतः संबंधित अधिकाऱ्यासोबत टेलिफोन द्वारे माहिती सुद्धा दिली परंतु समोरून प्रस्ताव विचाराधीन असून लवकरात ते इमारत पाडण्यात येईल असेच समजते.मात्र ती रीतसर केव्हा पाडली जाईल की एखाद्या विद्यार्थ्यांचा अपघात घडल्यावर पाडली जाईल हे येणारा काळ सांगेल.
तेव्हा शासन व प्रशासनाने ह्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेतात सदर व आरोग्य केंद्राची इमारत तात्काळ ती जागा शाळेसाठी मोकळी करून देण्यात यावी कारण की कारण की ती जागा मोकळी जर झाली तर शाळेत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी तेवढेच मोठे पटांगण होईल. कारण की दवाखाना हा दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित झालेला आहेच त्यामुळे ती खाली जागा शाळेला देऊन विद्यार्थ्यांना खेळासाठी पटांगण उपलब्ध होईल याची दखल घ्यावी. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहे त्या विद्यार्थ्यांसाठी शासन प्रशासनाने एवढे कार्य करावे व यात खैरी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन हे काम त्वरित करावे अशी शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांची मागणी आहे परंतु ग्रामपंचायत शासन प्रशासन हे काय करतात लक्ष देऊन विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्ता वाढी क्रीडा व शिक्षण यासाठी प्रयत्न करतात की एखाद्या विद्यार्थ्यांचा अपघात होण्याची वाट पाहतात याकडे खैरी गावातील पालकांचे व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शाळेसमोरच भरतो आठवडी बाजार
खैरी येथील आठवडी बाजार शाळेच्या अगदी समोर दर शुक्रवारी भरतो. त्याच दिवशी तेथील स्वच्छता केली जात नाही. शनिवारी सकाळी शाळा असते त्यामुळे रस्त्यावरील घाणीचा व आठवडी बाजारातील कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास विद्यार्थी, शिक्षकांना होतो. शाळेतील विद्यार्थी हे लहान असून ह्या गलिच्छ वातावरणामुळे त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे त्यांना गॅस्ट्रो डायरिया यासारख्या रोगांची लागण सुद्धा होऊ शकते. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना कराव्या पालक वर्गाकडून मागणी होत आहे. तसेच ह्या कन्याशासमोर गावातील ट्रॅक्टर व इतर गाड्या कायम उभे असतात त्यात नागरणी हेडंबा रोटावेटर यासारखे सामान शाळेच्या मुख्य गेट समोर समोर अस्ताव्यस्त उभे उभे ठेवले जातात यामुळे शाळेतील लहान मुलाच्या जीवत्वास धोका आहे तरी याची ग्रामपंचायत प्रशासनाने नोंद घेऊन शाळेसमोरील ह्या अवास्तविक गाडी धारकांना सूचना देऊन आपापल्या गाड्या दुसऱ्या खाली जागेत किंवा स्वतः घरासमोर उभे ठेवाव्या व शाळेसमोरील पटांगण खुले ठेवावे असे शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांची मागणी आहे.
