
!
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, देशाच्या राजकारणातील दूरदृष्टीचे नेते खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. पवार साहेबांच्या ८५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
या उपक्रमात रुग्णांना फळवाटप करून त्यांना आरोग्य आणि शुभेच्छांचा संदेश देण्यात आला. रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका व शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये दिलीप कन्नाके तालुका अध्यक्ष, प्रकाश खुडसंगे शहर अध्यक्ष, गौतम तागडे सरचिटणीस, मंगेश राऊत नगरसेवक, अरविंद तामगाडगे – माजी जि. प. सदस्य, संजय दुरबुडे, सुधाकर उगे, प्रवीण काकडे, सैय्यद लियाकत अली,रमेश पेंदाम,प्रदीप मसराम,किशोर उमरतकर, शंकर कोयचाडे, नानाजी कोवे,नितीन कोमेरवार, रुपेश कोठारे, मधुकर पावले, नागोराव पोटफोडे, राजु गुजरकर, गजानन सराटे, दिगंबर वडुलकर, कामलदास तिरणकर, पुरुषोत्तम बेंबारे, सुधाकर पालटकरसर्व पदाधिकाऱ्यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली व पवार साहेबांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा सामाजिक दृष्टिकोनाचा उपक्रम स्थानिक पातळीवर विशेष कौतुकास्पद ठरला असून राळेगावमध्ये या उपक्रमाची सर्वत्र चर्चा आहे.
