
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड
यवतमाळ जिल्ह्यामध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे अति मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे या नुकसान बाधित झालेल्या क्षेत्रातील शेती नुकसानीचे पंचनामे पुर्ण करून अहवाल सादर करावे तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी लवकरच जिल्ह्यातील,नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय समाधान शिबीर घेणार असल्याची माहिती पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांनी दिली महागाव तालुक्यातील विविध विषयासंदर्भात, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांनी तहसील कार्यालयात आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते या आढावा सभेला उपस्थित महागावचे उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे, उपविभागीय डी. वाय एस पी पोलीस अधिकारी विनायक कोते साहेब, तहसीलदार व्ही. एल. राणे जिल्हा परिषदचे उप अभियंता विवेक जोशी, गटविकास अधिकारी टाकरस साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र आडे, तालुका कृषी अधिकारी, तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित. होते
