ग्राम पंचायत निवडणुकीत स्वतंत्र उमेदवाराच्या भेटीला मनसे राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर बोर्डा गावात

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा


वरोरा तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुका जाहीर झाल्यापासून गावातील तरुणांनी राजकारणात येण्याची तयारी दाखवली त्यातील कित्येक तरुणांनी उमेदवारी अर्ज भरला ,आणि मैदानात आले देखील.बोर्डा गावातील अशाच एका स्वतंत्र उमेदवाराच्या भेटीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांनी आज बोर्डा गावात येऊन भेट घेतली.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी हे बोर्डा गावातील वॉर्ड क्रमांक 2 मधील स्वतंत्र उमेदवार आहेत.त्यांनी मागील काळात कित्येकाना मदत केली आहे .बोर्डा गावातील पाणीपुरवठा योजना बंद झाली तेव्हा झोपडपट्टी भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावं लागायच तेव्हा नागरिकांना सोबत घेऊन घागर आंदोलन देखील केले,तसेच बोर्डा गावातील नागरिकांना निराधार योजनेचा लाभ मिळवून दिला .बोर्डा गावातील वॉर्ड क्र 1 मध्ये असलेल्या भागात नाल्यांची सुविधा नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेस त्यांनी पाठपुरावा करीत ती नाली मंजूर करून पूर्णत्वास आणली.
अशाच कर्तबगार तरुणांना संधी द्यावी असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधी ची बोलताना सांगितले.