
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा राळेगावच्या पर्यावरण विभागाकडून शाखेच्या पटांगणावर असलेल्या झाडावर पक्षांकरिता जलपात्र लावण्याचा म्हणजेच चिमणी पाणपोई चा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
तारीख 4 मे 2025 रोज रविवारला वरील उपक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष अँड. सौ. रोशनी ताई कामडी तर प्रमुख वक्ते तालुका संघ चालक भूपेंद्र कारीया हे होते.
कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना प्रत्येकाने आपल्या दिनचर्यामध्ये पर्यावरण पूरक गोष्टीचा समावेश केला पाहिजे जसे पक्षांकरता जलपात्र लावणे, पाण्याचे पुनर्भरण करणे पाण्याचा कमीत कमी वापर करणे आणि पर्यावरणाचा कुठेही ऱ्हास होणार नाही याकरता प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले.
अध्यक्षीय भाषण करताना सौ. रोशनी ताई यांनी मुलांनी वाढदिवसानिमित्त एक झाड लावायला पाहिजे आणि त्याची जगवण्याची जबाबदारी पण घेतली पाहिजे असे मार्गदर्शन केले
कार्यक्रम यशस्वी करण्याकरता मेघशाम चांदे, युसुफअली सैय्यद ,प्रशांत मेंडोले, सुरज गुजरकर मोरेश्वर डाखोरे, योगेश पारिसे व भिकमचंद वर्मा यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमात वृक्षारोपण करणारे व त्याचे संगोपन करणारे श्री एकनाथजी राऊत व श्री लक्ष्मणराव डडमल यांचे नारळपान, पुष्पगुच्छ व जलपात्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संघाचे विभाग कार्यवाह अंकुशराव रामगडे ज्येष्ठ प्रचारक राहुलजी चौव्हाण, तुकडोजी विद्यालयाचे अध्यक्ष येनोरकर सर, बचपन स्कूलचे शुक्ला सर, भाजपच्या तालुकाध्यक्ष सौ. छायाताई पिंपरे जिल्हा भाजपा सरचिटणीस अनिल जी राजुरकर सौ प्रणाली ताई धुमाळ गांधी लेआउट येथील बंधू-भगिनी व विद्यार्थी मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन विकास वाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रवीण सेलोटे यांनी केले.अल्पोपहारनंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
