
यवतमाळ येथे नुकत्याच राज्यस्तरीय खुल्या गटाच्या टेबल व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या असून , नवोदय क्रिडा मंडळ राळेगाव च्या महिला खेळाडूंनी द्वितीय पारितोषित मिळवले . या संघात मयुरी दीपक चौधरी , साक्षी शंकर मेश्राम , तेजस्विनी विजय मेश्राम ,वंशीका विजय किन्नाके ,आचल लक्ष्मणराव सावसाकडे , तक्षशिला सुरेशराव नगराळे , निकिता बाळकृष्ण राउत इ. खेळाडू होते . या संघाला प्रशिक्षक म्हणून प्रफुल खडसे , नरेश दुर्गे , गणेश काळे , तर संघाचे व्यवस्थापक वैभव खूनकर हे होते . नवोदय क्रिडा मंडळाच्या खेळाडूंना नेहमी मार्गदर्शन करून राज्य स्तरावर खेळाडूंना संधी देणारे महेश भोयर यांचे यावेळी खेळाडूंना विशेष मार्गदर्शन लाभले.
सदर संघाला स्पर्धेसाठी सुरेश पाचपोर (उपाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य टे. व्हॉलीबॉल असो.) , विवेक मलिक (राष्ट्रीय खेळाडू , पंच ) यांनी संधी निर्माण करून दिली . त्यामुळे त्यांचे नवोदय मंडळाच्या वतीने आभार व्यक्त केले जात आहे . तसेच द्वितीय पारितोषिक मिळाल्या मुळे सर्व खेळाडू , शिक्षक , प्रशिक्षक याच्याकडून शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे .
