हिंगनघाट तालुक्यातील कुटकी-आर्वि (छोटी)-काचनगांव रोड खड्ड्यात….

प्रतिनिधी : प्रमोद जुमडे,हिंगणघाट

मागील 2 वर्षांपासून कुटकी-आर्वि छोटी-काचनगांव या रोडवर शेकडोच्या संख्येने मोठ-मोठे खड्डे पडले आहे. याकडे प्रशासन संपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. संबंधित रस्तावर 4 महिन्यापूर्वी मुरुम टाकून खड्डे बुझविण्यात आले होते आणि त्यानंतर काही दिवसातच खड्यांतील मुरुम निघाला व संपूर्ण रस्ता खड्ड्यात गेल्याच दिसून येत आहे. आता पावसाळात हेच खड्डे सामान्य जनतेसाठी जीवघेणे ठरणार. तसेच या खड्ड्यामुळे जर कुणाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार.या रस्त्यावर टोलनाका वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते.या वाहतूकीने अपघात घडुत येत असताना त्यात आता खड्ड्याची भर पडल्यामुळे सामान्य जनतेनी यातून वाट कशी काढायची हे कोण सांगणार हे प्रशासनाने सांगावे.2018 मध्ये डांबर टाकून तात्पुरते खड्डे बुजविण्यात आले त्यानंतर पुन्हा पडलेले गड्डे मुरूम टाकून बुजवण्यात आले परंतु आता पावसाळा चालू झाला रोडवरची मोठे मोठे खड्डे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या लक्षात येत नाही या गड्या मुळे मोठी जीवित हानी होऊ शकते हे नाकारता येणार नाही. तरीसुद्धा संबंधित लोकांनी जसे सरपंच ग्रामसेवक वरिष्ठांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन समस्या निकाली लावावे नाहीतर काचनगाव ची जनता गप्प बसणार नाही. असा इशारा सतीश कापसे वि.रा. आ. समिती युवा आघाडी अध्यक्ष अल्लीपूर (सर्कल )यांनी दिला आहे.