उपविभाग राळेगाव प्रथम लाईनमन दिवस साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

                             

दिनांक 4 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभाग राळेगाव या ठिकाणी प्रथम राष्ट्रीय लाईनमन दिवस साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान उपकार्यकारी अभियंता ढुमणे साहेब यांनी भूषवले, तसेच या कार्याप्रसंगी चव्हाण साहेब कनिष्ठ अभियंता झाडगाव, गिरी साहेब सहाय्यक अभियंता वडकी, तसेच कंत्राटदार काकडे साहेब, टेंबरे साहेब व आडे साहेब. उपस्थित होते. याप्रसंगी उपविभाग राळेगाव येथून सेवानिवृत्त झालेले लाईनमन सावरकर काका ,बोरकुटे काका , भुगावकर काका , महाजन काका, मंगळे काका , वाकुलकर काका, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच उपविभाग राळेगाव मधील सर्व (प्रकाशदूत) लाईनमन यांचा गुणगौरव पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन करण्यात आला. तसेच कार्यक्रमांमध्ये सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी लाईनमन यांचे कुटुंबीय सुद्धा या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश चौधरी यांनी पार पाडले तसेच आभार प्रदर्शन श्री कपिल नहाते यांनी केले. तसेच कार्यक्रमानंतर स्वरूची भोज आयोजित करण्यात आला होता. हा प्रथम राष्ट्रीय लाईनमन दिवस अतिशय उत्साहात उपविभाग राळेगाव या ठिकाणी साजरा करण्यात आला.