खोटी तक्रार करणाऱ्या कृषी केंन्द्रावर कारवाई करा

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव वडकी परिसरामध्ये बोगस बियाणे लिंकिंग या आधारावर परिसरातील काही प्रतिनिधिनी आपल्या वृत्तपत्रामध्ये बातमी प्रकाशित करून संबंधित विभागाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला यातच आपले पाप झाकण्यासाठी वडकी व परिसरातील वाढोणा बाजार खैरी दहेगाव येथील जवळपास अठ्ठावीस कृषी केंद्र माफियान्नी प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी संबंधित विभाग व वृत्तपत्राच्या जिल्हा कार्यालयामध्ये निवेदन दिले यात पैशाची मागणी करत असल्याचे नमूद केले होते असून हे सर्व प्रशासनाची दिशाभूल करून डोळेझाक करण्याचा प्रकार होता यानंतर तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने तालुका कृषी विभाग संबधित पोलीस स्टेशन तहसील कार्यालयामध्ये तक्रार निवेदन दिले असून खोटे निवेदन देणाऱ्या कृषी केंद्राची तपासणी करून योग्य कार्यवाही करा पैशाची मागणी न करता खोटे निवेदन देणाऱ्या दोषी कृषी केंद्र माफियावर पोलीस विभागाने कार्यवाही करावी अशी मागणी आज राळेगाव पत्रकार संघटनेने केली असून निवेदन देते वेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष महेश शेंडे फिरोज लाखानी अशोक पिपरे मनोहर बोभाटे मोहन देशमुख प्रमोद गवारकर मंगेश चवरडोल शंकर जोगी दीपक पवार गुड्डू मेहता महेश भोयर प्रवीण लोडे विशाल मासुरकर सचिन राडे शालिक पाल गणेश गौळकर राजेश काळे व इतरही पत्रकार बांधव यावेळी होते असून प्रशासनानेही या कृषी केंद्र माफियावर लवकरच कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन दिले आहे