
प्रतिनिधी:संजय अतकरी,कुही
कुही :- कुही शहरात आज दिनांक २५/०७/२०२१ रोज रविवारला भारतीय जनता युवा मोर्चा कुही शहराचे महासचिव, तडफदार युवा सामाजिक कार्यकर्ते मयूरदादाथोटे यांचा आमदार राजू भाऊ पारवे यांच्या कार्यावर प्रभावित होऊन काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री श्रीराजेंद्रबाबूमुळक आणि उमरेड विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार श्रीराजूभाऊपारवे यांच्या हस्ते हा प्रवेश घेण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव श्रीकेतनदादारेवतकर, उमरेड विधानसभा युवक काँग्रेसचे महासचिव मयूरदादातळेकार युवा नेते आकाशभाऊलेंडे त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कुही शहर युवक काँग्रेस तर्फे मयूर दादा थोटे यांचे काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याबाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..
