कर्जाला कंटाळून आंबोडा येथे विष प्राशन करुन शेतकर्‍याची आत्महत्या

प्रतिनीधी ::प्रवीण जोशी
यवतमाळ.

महागांव :तालुक्यातील आंबोडा येथिल शेतकरी गजानन फकीरा गायकवाड (वय ४३ वर्ष) यांनी कर्जाला कंटाळून व अतिवृष्टीमुळे पिकाच्या नुकसान झाल्यामुळे विषारी औषधी प्राशनकरुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.२२) सकाळच्या दरम्यान उघडकीस आली. काल राञीच ते घरातुन निघुन गेले होते. पिकाची परिस्थिती पाहून त्यांनी शेतात फवारणीचे शिल्लक असलेले विषारी औषधी प्राशन केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास परीविक्षाधिन उपअधिक्षक विनायक कोते यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार सुहास कायटे, संतोष जाधव, अर्जुन राठोड करीत आहेत.