रिधोरा येथे श्री अनंत महाराज यांचे जाहीर कीर्तन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

 

राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे सकल संत निर्णायक ज्ञान मंदिर कुंभार तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ येथील सद्गुरु श्री अनंत महाराज यांचे रिधोरा येथे दिनांक १३ जानेवारी रोजी शनिवारला जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आहे. सदर या कार्यक्रमाची रूपरेषा दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम तर सायंकाळी ५:३० वा. सामुदायिक प्रार्थना तर सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत प्रवचन श्री रमेशराव सातपुते यांचे तर सायंकाळी ७ ते ७:३० वाजेपर्यंत प्रवचन श्री सुरेश राव पोटे यांचे तर सायंकाळी ८ :३० वाजेपर्यंत कीर्तन श्री रमाकांत पांढरे यांचे तर सायंकाळी ८:३० ते १० वाजेपर्यंत श्री सद्गुरु अनंत महाराज यांचे सुमधुर वाणीतून जाहीर कीर्तन होणार आहे. तरी या कीर्तनाचा रिधोरासह परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान अखिल गुरुदेव सेवा मंडळ व समस्त गुरुभक्त मंडळी रिधोरा यांनी केले आहे.