
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत डाँ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाशी संलग्नीत महारोगी सेवा समीती द्वारा संचालीत वरोरा येथील आनंद नीकेतन कृषी महाविद्यालयाच्या अंतीम वर्षातील विद्याथीबींनी सुर्ला रोख शेतकऱ्यांना ‘गुटी कलम’ निर्मितीवर प्रशिक्षण दिले.
फळबाग उत्पादन हा दोष दीर्घकाळ व्यवसाय असल्याने जातिवंत व दर्जेदार कलम निवडने अत्यंत महत्त्वाचे असते. जातिवंत कलम निर्मितीसाठी मातृवृक्षाच्या पक्व फांदीवर दोन डोळ्यांच्या मधे २ ते ३ मी कढीची गोलाकार साल काढावी. ओलसर सेवाळ टस्पॅग्नम माँस) घट्ट गुंडाळावे. यावरती पॉलीथीन कागद सुनळीच्या सहाय्याने घट्ट बांधावा.गुटी कलमे बांधल्यानंतर ४-५ आठवडे झाल्या नंतर मुळ्या येण्यास सुरुवात होते. मुळांचा रंग तांबडा झाल्यावर गुटीच्या बालच्या बाजूने ६० दीवसांनी सिकेटर च्या साहाय्याने काप दयावा. कलमे मातृवृक्षापासून वेगळी करावी.
हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विद्यार्थीनींने विद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पोतदार, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. व्ही महाजन, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एन. पंचभाई व विषय विशेषज्ञ डॉ. अनील भोगावे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमात ऋतुजा खडसे, सुनिता खोकले, राजभी कोळसे, हर्षल मंढे, प्रणाली नेमाडे, धूनि पांडे या विद्यार्थीनींचा तसेच गावकऱ्यांचा समावेश होता.