
आज दिनांक ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन जि प प्रा शाळा शिवाजी नगर राळेगाव येथे डॉ. हेलन केलर व लूईस ब्रेल यांच्या प्रतिमेचे पुजनकरून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सदर कार्यक्रमाला मा.शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सरला देवतळे मॅडम समावेशीत शिक्षण तज्ज्ञ कु.माधुरी धामंदे,विशेष शिक्षक श्री. राहुल पोटरकर, श्री. दिपेश शेंडे, श्री. विनोद मेंढे, श्री. चंद्रकांत मडावी, विषय साधनव्यक्ति श्री. प्रशांत चांदोरे , जि प शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कांचन माने व अंगणवाडी सेविका श्रीमती चांदेकर स शि श्री.पूडके सर ,ओम रितेश कलांद्रे व या दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक तसेच शाळेतील विदयार्थी यांच्या उपस्थितीत दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रशांत चांदोरे,कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. माधुरी धामंदे, तर
श्री दिपेश शेंडे ,श्री. राहुल पोटरकर श्री विनोद मेंढे श्री. चंद्रकांत मडावी यांनी दिव्यांगांच्या २१ प्रवर्गाविषयी तसेच त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा याबाबत व पालकांना,शिक्षकांना येणाऱ्या समस्येनुरुप व कौशल्यानुसार मार्गदर्शन केले तसेच सर्वच प्रमुख अतिथी यांनी मार्गदर्शन केले व दिव्यांग विद्यार्थ्यांना चित्रकला वही स्केचपेन,खाऊ पुष्प देऊन स्वागत करण्यात आले
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री राहुल पोटरकर यांनी केले आनंदी व उत्साही वातावरणात कार्यक्रम साजरा करण्यात आला.
