नायदेव वासीयांनी अडविले पुन्हा कोळश्याची वाहतूक



तालुक्यातील मोहबाळा -नायदेव ग्रामपंचायत अंतर्गत एम आई डी सी परिसरात असलेल्या जि एम आर,वर्धा पावर कंपनीला कोळसा पुरवठा करण्याचे काम एकोना कोल माईन्स ला दिले आहे या कोळश्याची वाहतूक करण्यासाठी मात्र वेकोली ने आपला स्वतंत्र रस्ता बनविला नसून शेतकऱ्यांना त्याच्या शिवपांदण रस्त्यावरच माती गोटे टाकून वाहतूक सुरू करण्यात आली होती या वाहतुकीच्या विरोधात काही दिवसांपूर्वी ग्रामस्ताने बैलबंडी मोर्चा काढून होणाऱ्या त्रासाला प्रशासनाला अवगत केले होते,प्रशासनाने ही वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले मात्र काल दि 28 ऑगस्ट ला पुन्हा वाहतूक सुरू झाल्याने ग्रामस्थ भडकली आणि कोळशाची वाहतूक अडवून धरली कधी बंद कधी सूरु या प्रकारामुळे ग्रामवासी संतापले असून प्रशासनाने या वर उपाययोजना न केल्यास आत्मदहन करू असा इशारा सरपंच नंदलाल टेमुर्डे यांनी दिला आहे यावेळी असंख्य महिला, मुले, उपस्थित होती.