सन्मान चौथा स्तंभाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न समस्येचे निराकरण होईपर्यंत बातमीतून सातत्य आवश्यक
डॉ . संजय खडक्कार

उमरखेड : –
एखादा सामाजिक विषय घेऊन जोपर्यंत त्या विषयाचे निराकरण होत नाही तोपर्यंत पत्रकारांनी बातमीतून सातत्य ठेवून समस्या मार्गी लावली पाहिजे ते लेखणी करू शकते असे प्रतिपादन यशवंत चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठ अमरावती विभागिय संचालक डॉ . संजय खडक्कार यांनी केले. स्थानिक गो. सी. गावंडे महाविघालयात दि 28 एप्रील रोजी आयोजित पत्रकार सन्मान सोहळा व ‘आत्मदर्पण ‘ विशेषांकाचा प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाजचे अध्यक्ष राम देवसरकर, उपविभागिय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड , तहसिलदार आनंद देऊळगावकर , संस्थेचे सचिव डॉ. या . मा . राऊत , जेष्ठ विधीतज्ञ अॅड. संतोष जैन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. कदम आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते .
उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करतांना खडक्कार पुढे म्हणाले की , आगामी काळात शैक्षणिक धोरणात अनेक बदल झालेले दिसून येणार आहेत . महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मिळणार आहे नव्या शैक्षणिक धोरणात शिक्षकांनी देखील सज्ज राहूत नव्या पिढीचे विधार्थी घडविण्याचे कार्य करावे लागणार आहे. रेल्वे सुविधा अघापही उपलब्ध नसल्याने यवतमाळ जिल्हा हा विकासाच्या बाबतीत माघारला आहे. अशा विषयावर सातत्याने धारदार लिखान करून राज्यकर्त्यांना आणि प्रशासनाला प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रेरीत केले पाहीजे असेही यावेळी ते बोलताना म्हणाले.
उपविभागिय अधिकारी डॉ . व्यंकट राठोड यांनी वातावरण निर्मितीसाठी पत्रकारांची भुमिका महत्वाची असून पत्रकारांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष सुबक मांडणी करून सडेतोड पत्रकारिता करावी असे विचार मांडले . तर वस्तुनिष्ठ मांडणी करण्याची हिम्मत न बाळगल्यास पत्रकारीता दुबळी होईल असे विचार जेष्ठ विधिज्ञ अॅड. संतोष जैन यांनी व्यक्त केले . सदर कार्यक्रमात उमरखेड शहरातील जवळपास 70 पत्रकारांचा सन्मान करण्यात आला तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत येथील महाविद्यालयात असलेल्या बी. ए. जनसज्ञापन व वृत्तपत्र विद्या पदवी शिक्षण क्रमाच्या विद्यार्थ्यांचा प्रात्यक्षिकाचा भाग असलेले आत्मदर्पण या विशेषाकाचा विमोचन सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बि. यू. लाभशेटवार यांनी केले तर आभार प्रा. सिध्देश्वर जगताप यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जनसंज्ञापन व वृत्तपत्र विद्या पदवी शिक्षणक्रमाचे समंत्रक प्रा संतोष मुडे, प्रा. सिध्देश्वर जगताप, प्रा. लक्ष्मीकांत नंदनवार केंद्र सहाय्यक विकास माने , प्रा. व्ही. के. राठोड यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्याथ्यांनी परिश्रम घेतले .