जलजीवन मिशन अंतर्गत होतं असलेला बोगस काम बंद करण्याची मागणी –

ग्रामपंचायत प्रशासनाची ठेकेदारा विरोधात सी.ओ. कडे धाव

ग्रामपंचायत प्रशासनाने खराब रस्ते संदर्भात ठेकेदारावर फोडला खापर

ग्रामपंचायत प्रशासनाची ठेकेदारा विरोधात उपोषणाची तयारी

पत्रकार परिषद घेऊन विविध आरोप

प्रतिनिधी फुलसावंगी –


ग्रामपंचायत प्रशासना च्या वतीने येथे होतं असलेल्या निकृष्ट, कालबाह्य व संथ गतीने होतं असलेल्या जलजीवन मिशन चा या ठेकेदारचा काम तातळीने बंद करण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायत कार्यलयात घेण्यात आलेल्ल्या पत्रकार परिषदेत ठेकेदारावर अनियमिततेचा ठपका ग्रामपंचायत च्या वतीने ठेवण्यात आला असून गावात रस्त्यांची खराब अवस्थेतला ठेकेदाराचा वेळ काढू धोरणच जवाबदार असल्याचा आरोप या वेळी ग्रामपंचायत कडून करण्यात आला.
येथील गावांतर्गत असलेल्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्ते चिखलानी माखले आहेत.या रस्त्यांनी पायी चालणे सुद्धा जिकरीचा विषय झालेला आहे. या कारणांनी ग्रामपंचायत प्रशासना विरोधात नागरिकांत नाराजी चा सुर निर्माण होतं आहे.या सर्व विषयावर आज फुलसावंगी ग्रामपंचायत च्या सरपंचा सारजा बाई वाघमारे, सदस्य कुणाल नाईक, ग्रामपंचायत सचिव सौ.सविता वाघमारे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन या विषयी आपली भूमिका मांडली.
गावातील जल जीवन मिशन प्राधिकरण व जल जीवन मिशन (JJM) ह्यांनी गावातील रस्ते व रापटे फोडून बोगस काम केले आहेत. सदर रस्त्याची दुरुस्ती करणे किवा कॉन्केटीकरण करणे ही सदरच्या ठेकेदाराची जबाबदारी आहे. परंतु तसे न होता रस्ते व रापटे फोडून जशाच तसे ठेवले आहे. या खराब रस्त्यात मुळे एका व्यक्तीला जीव गमवावं लागला.कामात होतं असलेली दिरंगायी मुळे गावातील अंतर्गत रस्ते पायी चालण्या योग्य ही राहिलेले नाही. या बाबतीत उपअभियंता यांना पत्रव्यवहार केलेला होता. पण त्यांनी कुठल्याही प्रकारे अर्जाचा विचार केलेला नाही. कितेक वेळेस हा विषय दोन्ही कंत्राटदारांना दूरध्वनी वरून संपर्क साधून काम लवकरात लवकर पूर्ण करून रस्ते व रापटा ह्यांची दुरुस्ती करून देण्यात यावी. असे कळविले असता सुधारणा करून काम झालेल्या ठिकाणी मुरूम टाकून पूर्वी प्रमाणे रस्ता किवा सिमेंट रस्ता करून नंतरच दुसन्या रस्त्याचे काम करण्यात यावे असे सुचविले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहे.एकदरीत फुलसावंगी येथे रस्त्याच्या दयनीय अवस्थेला ठेकेदाराचा वेळ काढू धोरणच जवाबदार असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आले असून या अनियमितते बद्दल ग्रामपंचायत प्रशासन सदरच्या ठेकेदाराचे काम बंद करण्याची मागणी जिल्हा कार्यकारी अधिकारी यांच्या कडे करण्यात येणार असल्याची मागणी करणार असल्याची माहिती कुणाल नाईक यांनी दिली. शिवाय एका पत्रा द्वारे जल जीवन प्राधिकरण विभागाला का कामा विरोधात ग्रामपंचायत सरपंच व सदस्य जिल्हा अधिकारी कार्यलयात उपोषण सुद्धा करणार असल्याचे पत्र व्यवहार ग्रामपंचायत ने केले आहेत.