
सहसंपादक : रामभाऊ भोयर
नॅशनल हायवे क्रमांक ४४ वर एसटी बस व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार दिलीप कुटे वय 40 वर्ष राहणार खैरी तालुका राळेगाव याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची ही घटना आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या दरम्यान वडकी पासून काही अंतरावर असलेल्या बोरी इचोड गावाजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार गणेशपेठ आगाराची नागपूर हैदराबाद एसटी बस क्र (एमएच ४० सीएम ६१२३) ही हैदराबाद कडे जात होती तर खैरी येथील दिलीप कुटे हा आपल्या दुचाकी क्रमांक एम एच ३२ एल ७१९३ या क्रमांकाच्या दुचाकीने बोरी ईचोड गावाजवळ असलेल्या वळणावरून वडकी कडे यायला विरुद्ध दिशेने निघाला असता समोरून येणाऱ्या नागपूर हैदराबाद या बसची व दुचाकीची समोरासमोर जबर धडक झाली.
या धडकेनंतर दुचाकीस्वार दिलीप कुटे हा रस्त्यावर पडला त्याचे डोक्याला खंबीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिकांनी घटनेची माहिती वडकी पोलिसांना दिली.यावेळी बिट जमादार अमोल चौधरी आकाश कुदुसे यांनी लगेच घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली तसेच अपघातस्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राळेगाव येथे पाठविला असून अधिक तपास वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांचे मार्गदर्शनात अमोल चौधरी हे करीत आहे.
