
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पर्यावरण संवर्धन व विकास समिती ही संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असून पर्यावरण व संवर्धन विकास समितीने आपली इच्छाशक्ती व तसेच पर्यावरण क्षेत्रातील काम, सेवाभावी वृत्ती, व सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड विचारात घेऊन दिं ७ जानेवारी २०२३ रोज रविवारला राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील राळेगाव तालुका पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष तथा पब्लिक पोस्ट दैनिक तालुका प्रतिनिधी मनोहर बोभाटे यांची निवड करण्यात आली असून ही निवड दोन वर्षा करिता करण्यात आली आहे.
मनोहर बोभाटे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी व प्रभारी यवतमाळ जिल्हा पदी निवड केल्याने पुढील काळात जिल्ह्यातील पर्यावरण चळवळीची आवड असणारे व स्वच्छने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन व समितीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची सुसंवाद साधून तसेच नियमानुसार काम करून जिल्ह्यातील पर्यावरण चळवळ वाढवावी यासाठी त्यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीने तालुक्यात सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
